Daily Mahasatta

Daily Mahasatta

महापालिका सुरू करणार 120 ऑक्सिजन बेडचे कोविड हॉस्पिटल


महापौर आयुक्तांकडून पाहणी: मिरज पॉलिटेक्निक येथे युद्धपातळीवर काम सुरू

सांगली (प्रतिनिधी) : सांगली महापालिका क्षेत्रात वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता सांगली महापालिका प्रशासनाने तातडीने 120 ऑक्सिजन बेडचे कोविड हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आज महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडणीस यांनी या जागेची पाहणी केली. मिरज पॉलिटेक्निक येथे कोविड हॉस्पिटलचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. 21 एप्रिल पूर्वी हे हॉस्पिटल सुरू करण्याच्या दृष्टीने मनपा प्रशासनाकडून गतीने काम सुरू आहे.

मिरज तंत्रनिकेतन महाविद्यालय येथे यापुर्वीच महापालिकेने कोव्हिड हेल्थ सेंटर सुरू केले आहे. यामध्ये 100 बेडचे हे कोविड सेंटर पूर्ण क्षमतेने सुरू आहे.  आज महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि मनपाआयुक्त नितीन कापडणीस यांनी कोविड केअर सेंटरची पाहणी केली. 

याच महाविद्यालयामध्ये आता 120 ऑक्सिजन बेडचे आणि 100 आयसोलेशनचे बेडचे कोविड हॉस्पिटल सुरू केले जाणार आहे. या हॉस्पिटलच्या तयारीचे काम महापालिकेने गतीने हाती घेतले आहे. आज महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडणीस यांनी  भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. सदरचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच रुणांच्या सेवेसाठी सुरु करणेत येत आहे. यावेळी उपायुक्त  राहुल रोकडे, मनपा आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहर अध्यक्ष राहुल दादा पवार तसेच महापालिकेचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments