Daily Mahasatta

Daily Mahasatta

विघ्नहर्ता पतसंस्थेचा 11 कोटी 53 लाखांचा व्यवसाय

पेठ (रियाज मुल्ला) : पेठ ता. वाळवा येथील विघ्नहर्ता ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्थेने 2020- 2021 या वर्षात 11 कोटी 53 लाख 60 हजार इतका एकत्रित व्यवसाय केला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन डॉ. सुभाष भांबुरे यांनी दिली.

पेठेचे युवा नेते व संस्थेचे संस्थापक अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 2016 पासून ही संस्था कार्यरत असून 2020- 2021 या सालात संस्थेच्या ठेवी 7 कोटी 9 लाख इतक्या झाल्या असून सभासदांना त्यांच्या गरजेनुसार 4 कोटी 44 लाख इतका कर्ज पुरवठा केला आहे. संस्थेची गुंतवणूक 3 कोटी 76 लाख इतकी आहे. यातून संस्थेस 24 लाख ढोबळ नफा झाला असल्याची माहिती डॉ. सुभाष भांबुरे यांनी दिली.

याप्रसंगी संस्थेचे व्हा. चेअरमन सयाजी नायकल, संचालक अशोक पाटील, विकास मगदूम, दीपक माळी, अमोल भांबुरे, अविनाश पाटील, विजय मधाळे, अंकुश मस्के, सरदार जमादार, संचालिका सौ. कुंदाताई साळुंखे, सौ. पद्मावती माळी, सचिव विक्रम कदम तसेच संस्थेचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments