Daily Mahasatta

Daily Mahasatta

कोरोना ची दक्षता घेऊन Mpsc परिक्षा होणार ? पहा काय म्हणाले मंत्री विश्वजीत कदम

 

सांगली (प्रतिनिधी) : एमपीएससी परीक्षेला स्थगिती देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप होत आहे. कोरोना संसर्गाचा फैलाव होणार नाही याची सर्व काळजी घेत परीक्षा कशी होईल, याबाबत सरकारमधील वरिष्ठांशी चर्चा करून लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी मी व्यक्तिशः प्रयत्न करीत आहे, असे मत कृषी राज्य मंत्री डाॅ विश्वजीत कदम यांनी सोशल मिडीयातून व्यक्त केले आहे. 

मंत्री कदम यांनी म्हंटले आहे, एमपीएससी परीक्षेसाठी महाराष्ट्रभरातील, विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी अनेक वर्षे खडतर मेहनत घेतो. त्यामुळेच परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने प्रचंड मनस्ताप होत असल्याची भावना विद्यार्थी वर्गाकडून व्यक्त होत आहे. विद्यार्थीहिताचे रक्षण करण्यासाठी आम्ही कायम त्यांच्यासोबत आहोत. याबाबत लवकरच मंत्रीमंडळातील वरिष्ठांशी चर्चा करून कोरोना चा प्रादुर्भाव न होता mpsc परिक्षा घेण्याबाबत निर्णय होईल, असे मत मंत्री डाॅ विश्वजीत कदम यांनी व्यक्त केले आहे. 

अर्थातच, एमपीएससी परिक्षा पुढे ढकलली गेल्यामुळे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरून निदर्शने करित असताना मंत्री डाॅ विश्वजीत कदम यांनी देखील सरकारच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे मंत्री कदम वरिष्ठाशी चर्चा करुन सरकारला पूर्वनियोजित वेळेत एमपीएससी परिक्षा घेण्यास भाग पाडतात का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Post a Comment

0 Comments