Daily Mahasatta

Daily Mahasatta

जत शहरात अज्ञातानी डंपर पळविला

जत (सोमनिंग कोळी) जत येथील मोरया कंट्रक्शनच्या मालकीचा अशोक लेलँड कंपनीचा डंपर एम. एच सी. आर 1582 गुरूवारी मध्यरात्री अज्ञात चोरांनी जत शहरातील भर चौकातून पळून नेला. याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात अमोल चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.

मोरया कंट्रक्शनचे मालक अमोल चव्हाण यांनी गुरुवारी दिवसभर काम झाल्यानंतर डंपर जत शहर रोड वरील केएम हायस्कूल जवळ चालकाच्या घराजवळ उभा केला होता. गुरुवारी मध्यरात्री साडेबारा ते दोनच्या सुमारास काही अज्ञातांनी डंपरची पुढील काच तोडून आत प्रवेश करून हा डंपर पळून नेला. पहाटे चार वाजता चालक उठल्या नंतर गाडी चोरी गेल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी पोलिसात अमोल चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक श्री. मोहिते करीत आहेत.

Post a Comment

0 Comments