Daily Mahasatta

Daily Mahasatta

कृषी औजारे अनुदानासाठी महा डी. बी. टी. पोर्टल पुन्हा चालू : विठ्ठलराव साळुंखे

विटा (प्रतिनिधी) : महा डी. बी. टी फार्मर पोर्टलवर अर्ज करण्याची प्रक्रिया  पुन्हा सुरू  झाली आहे. अजून आपण नोंदणी  केली नसेल तर पोर्टल सुरू करणेत आले त्याचा जास्तीत जास्त शेतकर्यांनी फायदा घ्यावा, असे आवाहन शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी पतसंस्थेचे कार्यकारी संचालक विठ्ठल साळुंखे यांनी केले आहे.


विठ्ठल साळुंखे म्हणाले,  बरेच शेतकरी या ऑनलाइन पद्धती मुळे वंचित राहिले होते. आता चौथ्यांदा ही सेवा सुरू होत आहे. ज्यामुळे शेतक-र्यांनी त्याचा लाभ घ्यावा. या पूर्वी ज्या शेतक-र्यांनी नोंदणी केली होती त्याची सोडत झाली. ती नावे ही आपल्याला शिवप्रताप अग्रोटेक शेतकरी उत्पादक कंपनी येथे पाहावयास मिळतील. त्या बरोबर जी औजारे मंजूर झाली आहेत त्यामध्ये चाफ कटर , रोटर, टिलर, मल्चर पलटी, मळणी मशीन आणी सर्वच औजारांची मोठी रेंज मॉल मध्ये उपलब्ध आहेत.

सांगली जिल्ह्यात ज्यांना ज्यांना औजारे मंजूर आहेत. त्यांनी त्वरित शिवप्रताप अग्रोमॉल विटा येथे संपर्क साधावा ज्यांना ठिबक सिंचन मंजूर झाली आहेत, त्यांनी ही आमचेशी संपर्क साधावा आणि ज्यांनी आद्याप नोंदणी केली नाही अशा शेतक-र्यांनी शेती औजारे शेततळे, ठिबक सिंचन यासाठी नोंदणी करावी. या बाबत आपण शिवप्रताप अग्रोमॉल विटा  येथे संपर्क साधावा, असे आवाहन साळुंखे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments