Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

कुपवाड शहर संघर्ष समितीच्या मागणीस यश, कोरोना लसीकरण सुरु

कुपवाड (प्रमोद अथणिकर )
कोविड-19 अंतर्गत लसीकरणासाठी सांगली, मिरजे प्रमाणे कुपवाड मध्ये तीन ठिकाणी कोविड लसीकरण केंद्र सुरु करा, अशी मागणी आज कुपवाड शहर संघर्ष समितीच्या वतीने आयुक्तांच्याकडे लेखी निवेदन देऊन करण्यात आली होती.

तातडीने या मागणीची दखल घेऊन स्वतः महापौर मा. दिग्विजय सूर्यवंशी यांनी मनपाचे मुख्य आरोग्यधिकारी चंद्रकांत आंबोळे यांना दोन दिवसात केंद्र सुरु करण्याची सूचना दिली होती. त्यानुसार आज कुपवाड मधील अलोपॅथिक दवाखाना केंद्र क्र. ०४ येथे जेष्ठ नागरिकांना मोफत कोरोना लसीचे केंद्र चालू केले आहे. आज लसीकरण केंद्रास उपायुक्त मा. स्मृति पाटील, महापौर मा. दिग्विजय सूर्यवंशी, नगरसेविका सौ. वहीदा नायकवड़ी यांच्यासोबत कुपवाड शहर संघर्ष समितीचे पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष सनी धोतरे,कार्याध्यक्ष अनिल कवठेकर, उपाध्यक्ष संतोष माने, प्रविण कोकरे, खजिनदार प्रकाश व्हनकडे, संचालक महावीर खोत, समीर मुजावर, महेश निर्मळे, श्रीकृष्ण कोकरे, सुनील भोसले, प्रकाश पाटील, अशोक रास्कर, बिरु आस्की, अमोल कदम व तेथील स्टाफ आदी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments