Daily Mahasatta

Daily Mahasatta

विट्यात सदाशिवभाऊंच्या नेतृत्वाखाली विकास कामांचा झंझावात : भरत कांबळे

विटा : शिवसंगम मार्ग पूलाची उंची व रुंदी वाढविणे या कामाचे भूमिपूजन करताना हणमंत निरगुडे. यावेळी भरत कांबळे, प्रशांत कांबळे उपस्थित होते.

विटा (प्रतिनिधी)
माजी आमदार सदाशिवभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली विटा शहरात विकास कामांचा झंझावात सुरु आहे. शहरातील उपनगरापासून वाडी वस्ती पर्यंत चांगल्या दर्जाच्या नागरी सुविधा देण्यात पालिकेला यश आले आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे मत भरत कांबळे सर यांनी व्यक्त केले आहे.

विटा येथील प्रभाग क्र 9 व 11चे आण्णा भाऊ साठे नागरी दलित वस्ती फंडातून शिवसंगम मार्ग पूलाची उंची व रुंदी वाढविणे या कामाचे भूमिपूजन हणमंत निरगुडे सर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी भरत कांबळे बोलत होते.

भरत कांबळे म्हणाले, स्वच्छ सर्वेक्षण मध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावण्यासाठी माजी नगराध्यक्ष अॅड वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण विटा शहर एकवटले आहे. शहरात स्वच्छतेसह दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करण्यास देखील प्राधान्य देण्यात येत आहे.
शिवसंगम मार्ग याठिकाणी पूर्वीचे असणारे दोन पूल अरुंद व तीव्र उताराचे आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. रस्ता अरुंद असलेने वाहनधारकांना कसरत करावी लागत होती. त्यामुळे माजी आमदार सदाशिवराव (भाऊ )पाटील यांच्या सुचनेनुसार सदर चे काम मंजूर करणेत आले. या ठिकाणी दोन पुलांची उंची व रुंदी वाढविणे तसेच ओढ्याला आरसीसी रिटेनिंग भिंत इ कामे करणेत येणार असून या दोन्ही कामांची रक्कम रु 1 कोटी 3 लाख इतकी आहे, अशी माहिती भरत कांबळे यांनी दिली.

माजी उपनगराध्यक्षा सौ. मालती कांबळे व नगरसेविका सौ. प्रगती कांबळे यांनी या कामाच्या मंजुरीसाठी प्रयत्न केले. या कार्यक्रमास माजी नगरसेवक प्रशांत कांबळे, छोटया शितोळे, स्वप्नील इंगळे, अविनाश शिंदे, सुनील वस्त्रे, अमोल ढेरे, गजानन निकम व उमेश कुलकर्णी, अमोल इंगळे व कार्यकर्ते उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments