Daily Mahasatta

Daily Mahasatta

विटा परिसरात कोव्हीड लसीकरणासाठी चांगला प्रतिसाद : डाॅ अविनाश लोखंडे


विटा (प्रतिनिधी) : सध्या आपल्या जिल्ह्यात कोविड 19 लसीकरण मोहीम चांगल्या प्रकारे चालू झाली आहे. सध्या या लसीकरणाचा 4 था टप्पा चालू आहे. या अंतर्गत 60 वर्षे वयावरील सर्व नागरिकांना मोफत कोविड 19 ची लस दिली जात. विटा परिसरात देखील  कोव्हीड लसीकरणासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती विटा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ अविनाश लोखंडे यांनी केले आहे. 

डाॅ. लोखंडे म्हणाले, जेष्ठ नागरिक यांच्या प्रमाणेच 45 ते 59 या वयोगटातील नागरीक जे व्याधिग्रस्त आहेत  म्हणजे या वयोगटातील ज्या लोकांना बी पी, शुगर, कॅन्सर, हृदयाचा, किडनी चा आजार इत्यादी आजार ज्यासाठी कायमस्वरूपी औषधोपचार चालू आहेत  असे आजार असणारे व्यक्ती यांना विहित नमुन्यात ज्या डॉ ची ट्रीटमेंट चालू आहे त्या डॉक्टरांचे मेडिकल सर्टिफिकेट घेऊन आल्यास त्यांना मोफत लस दिली जाईल, अशी माहिती डाॅ अविनाश लोखंडे यांनी दिली आहे. 

लसीकरण ठिकाण

शासकीय:

1) ग्रामीण रुग्णालय , विटा

2) प्राथमिक आरोग्य केंद्र , विटा

3) प्राथमिक आरोग्य केंद्र, वेजेगाव

4) प्राथमिक आरोग्य केंद्र,खानापूर

लसीकरण वेळ

सकाळी 9 30 ते 1 30

दुपारी 3  ते 5 30

तसेच, या वयोगटातील व्यक्तींना  खाजगी ठिकाणी लस घ्यावयाची आहे त्यांच्यासाठी विटा शहरातील 2 खाजगी हॉस्पिटलमध्ये ही विकत (250 रुपये प्रति डोस) या दराने कोविड 19 ची लस उपलब्ध आहे.

खाजगी रुग्णालय

1) ओमश्री हॉस्पिटल विटा

2) बंडगर ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा

----------------------------------

लस सम्पूर्ण सुरक्षित आहे..

कोव्हीड 19 साठी दिली जाणारी लस अत्यंत सुरक्षित आहे. तरी जास्तीत जास्त 60 वर्षाच्या वरील जेष्ठ नागरिक व 45 वर्षे वयाच्या वरील व्याधीग्रस्त नागरिकांनी या लसीकरण सुविधांचा लाभ घ्यावा.

- डॉ अविनाश लोखंडे

वैद्यकीय अधीक्षक, विटा ग्रामीण रुग्णाल

Post a Comment

0 Comments