Daily Mahasatta

Daily Mahasatta

तुकाराम महाराज बीज रद्द केल्यास राज्यभर जनआंदोलन करणार : दत्ताजी यादव महाराज

कुपवाड (प्रतिनिधी) : सांगली येथे झालेल्या राष्ट्रीय वारकरी विकास महासंघ कार्यकारिणी बैठकीत येत्या ३0 मार्च रोजी तुकाराम बीज हा सोहळा साजरा होत असून राज्य शासनाने राज्यभर फक्त हिंदू देवदेवतांचे यात्रा, उत्सव, सोहळे कोवीड-१९ या निमित्ताने रद् करण्याचा जनू काही मक्ता घेतला आहे. तसेच इतर धर्मियांच्या समारंभाना व राममंदिर येथे झालेल्या सोहळ्यामध्ये तसेच वाईन शॉप, बिअर बार, हॉटेल इत्यादी ठिकाणी लॉकडाउनचे नियम शिथील करून पुर्ववत केले. मग वारकरी, टाळकरी, माळकरी व महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगाचे संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर यांच्याच ठिकाणी अध्यात्मिक सोहळ्यासाठी व यात्रा उत्सवासाठी शासन निर्बंध घालत आहे. यातून शासनास नेमके काय साध्य करायचे आहे. कोरोना हे एक निमित्त आहे त्याच्या पाठीमागून हिंदू धर्मातील उत्सव, यात्रा बंद करणे हाच एकमेव पर्याय दिसतो. तेव्हा श्री क्षेत्र देह् येथील संत तुकाराम महाराज बिजोत्सव सोहळा रद्द केल्यास महाराष्ट्रभर जनआंदोलन उभा करण्यात येईल, याचा शासनालाच दुष्परिणाम होवू शकेल. याची शासनाने नोंद घ्यावी व या सोहळ्यास परवानगी द्यावी, असे आवाहन ह.भ.प. दत्ताजी यादव महाराज यांनी केले आहे.

यावेळी बंडा तात्या कराडकर यांनी जे आवाहन केले त्यास महाराष्ट्रातील तमाम वारकरी बंधूंनी त्यांच्या आदेशांचे पालन करून तळागाळामध्ये आवाज उठवावा कारण ते ज्येष्ठ संत असल्याने आम्हास मार्गदर्शक आहेत.

यावेळी गायनाचार्य सुभाष तुपे यांची वारकरी विकास महासंघाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याप्रसंगी दीपक दाभोळे (कार्याध्यक्ष, महा. राज्य), आनंदा देसाई, प्रकाश तुपे (अध्यक्ष प.महा. ), जिल्हाध्यक्ष शहाजी वायदंडे, अशोक रास्ते, सुनिता भोसले (जिल्हाध्यक्ष), जयश्री सुतार (उपाध्यक्ष), छाया दाभोळे (कार्याध्यक्ष) कमल वाघ (मिरज तालुका अध्यक्ष), नंदा पहिलवान, विजया भोसले, रुक्मिणी टवळ, शारदा झांबरे, रुक्मिणी कांदळे, कुसुम पाटील, लक्ष्मी माळी, निवृत्ती माळी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक जयवंत पाटील (तालुका उपाध्यक्ष) यांनी केले. आभार जोतीराम निकम यांनी मानले.

Post a Comment

0 Comments