: महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या संकल्पनेतून आमराईचा कायापालट : सांगलीकर जनतेचा उद्यानाकडे ओढा
सांगली (प्रतिनिधी) : सांगलीच्या ऐतिहासिक आमराईत पश्चिम महाराष्ट्रातील पाहिले टाकाऊ वस्तूपासून आकर्षक उद्यान साकारले आहे. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या संकल्पनेतून सांगलीच्या आमराईचा कायापालट झाला असून हे आकर्षक उद्यान सांगलीकर जनतेचे आकर्षण बनले आहे. बालगोपाळापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांच्या मनोरंजनाचा समावेश असलेल्या आमराईकडे सांगलीकर जनतेचा उद्यानाकडे ओढा लागला आहे.
ऐतिहासिक वारसा असणारी आमराई सांगलीच्या मध्यवर्ती आहे. गर्द झाडीने वेढलेल्या आमराईत आता टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून आकर्षक उद्यान विकसित करण्यात महापालिका यंत्रणेला यश आले आहे. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी टाकाऊ वस्तूपासून उद्यान विकसित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सांगलीकर जनतेने आपल्याकडील टाकाऊ वस्तू महापालिकेकडे जमा केल्या. याचबरोबर महापालिकेनेही अनेक टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करीत त्यांचा आकर्षक उद्यानासाठी वापर केला आहे.
आमराई साकारण्यात आलेले हे उद्यान संपूर्णपणे टाकाऊ वस्तूपासून बनवण्यात आले आहे. त्यामुळे कमी बजेटमध्ये सांगलीकर जनतेला एक सुंदर उद्यान मिळाले आहे. आमराईचा वैभवात भर घालणारे हे उद्यान पश्चिम महाराष्टातील पहिले उद्यान आहे.या उद्यानात जुन्या प्लास्टिकच्या वस्तू, टायर, बॉटल , लाकडी वस्तू, लोखंडी वस्तूंचा पुनर्वापर करून खेळणी, आणि अन्य साहित्य बनवले आहे. नव्या संकल्पनेतील उद्यानाला लोकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. या उद्यानात आता अनोखी संकल्पना राबविण्यात आली आहे. शासनाने सुरू केलेल्या स्वच्छता अभियान आणि माझी वसुंधरा अभियान या दोन अभियानाच्या अंतर्गत पर्यावरण पूर्वक काम केले जात आहे. या अभियानाच्या अंतर्गतच सांगली महापालिकेने एक अनोखा उपक्रम राबवला आहे. बेस्ट फॉर वेस्ट या संकल्पनेतून उद्यान विकसित करण्यात आल आहे.
जुन्या प्लास्टिक, टायर, बॉटल, लाकडी वस्तू, लोखंडी वस्तूंचा पुनर्वापर करून खेळणी, आणि अन्य साहित्य बनवले आहे. यामध्ये जुने टांगा विविध प्राण्यांच्या प्रतिकृती, झाडांचे कुंपण, झाडांच्या ओंडक्या पासून बैठक व्यवस्था, जुन्या छत्र्या, प्लास्टिक बाटल्या पासून विविध वस्तु, झोपाळे अश्या विविध वस्तू तयार करण्यात आले आहे. या उद्यानाचे सांगलीकर जनतेने भरभरून कौतुक केले आहे
0 Comments