Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

सांगली जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक, दिवसभरात ४४ पाॅझिटीव्ह

सांगली (प्रतिनिधी)
सांगली जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज रविवार ता. ७ रोजी दिवसभरात जिल्ह्यात ४४ रूग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यामध्ये सांगली मनपा क्षेत्रातील १७ रूग्णांचा तसेच आटपाडी- १० आणि खानापूर तालुक्यातील ७ रुग्णांचा समावेश आहे.

सांगली जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसापासून पुन्हा एकदा कोरानाचा आकडा झपाट्याने वाढत आहे. गेल्या दोन तीन महिन्यात जिल्ह्यात दररोज दहाच्या आसपास रूग्ण आढळत होते. त्यामुळे प्रशासनाने सुटकचा निश्वास टाकला होता. मात्र हा आकडा वाढत जात आज जिल्हयात ४४ रूग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचे संकट गडद होताना दिसत आहे.

आज सापडलेले तालुकानिहाय रूग्ण पुढील प्रमाणे : आटपाडी-१०, जत- ०० कडेगाव - ०१, कवठेमहकाळ - ००, खानापूर ०७, मिरज- ०२, पलूस- ०२, शिराळा-१ महापालिका क्षेत्रातील सांगली- ११, मिरज- ६ असे एकूण ४४ रूग्ण जिल्हयात पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. तर दिवसभरात १२ रूग्ण कोरोना मुक्त झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

Post a comment

0 Comments