Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

वांगी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संजय कदम यांची बिनविरोध निवड

कडेगाव : (सचिन मोहिते )
सौ. विद्या पाटणकर यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्या वांगी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली होती. रिक्त झालेल्या पदावर संजय कदम यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहिती सरपंच डॉ. विजय होनमाने यांनी दिली. सदरची निवड सरपंच डॉ .विजय होनमाने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली .

संजय कदम यांचा एकमेव अर्ज आल्याने निवड बिनविरोध झाल्याचे जाहिर करण्यात आले. नूतन उपसरपंच संजय कदम यांचे पेढे भरवुन स्वागत व सत्कार करण्यात आला तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या निवडीप्रसंगी विद्या पाटणकर , बाबासो सुर्यवंशी, सुरेश मोहिते , मिलिंद साळुंखे, राहुल साळुंखे, गोरख कांबळे, काशिनाथ तांदळे, विट्ठल कांबळे, नयना शिंदे , मोहन मोहिते, पांडुरंग मोहिते व ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. निवडीनंतर उपसरपंच संजय कदम यांनी स्व. डॉ . पतंगराव कदम यांच्या समाधी स्थळ आणि ग्रामदैवत श्री अंबिका देवीचे दर्शन घेऊन आर्शिवाद घेतले . यावेळी मंत्री विश्वजीत कदम जनसंपर्क कार्यालय वांगी व अंबिका मंदिर येथे सत्कार घेण्यात आला .

Post a comment

0 Comments