Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

मसुचीवाडी मध्ये विकासकामांचा धडाका

वाळवा (रहीम पठाण)
मसुचीवाडी ता. वाळवा ग्रामपंचायत निवडणूक नुकतीच पार पडली आहे. या ग्रामपंचायतीत नाम. जयंतरावजी पाटील यांच्या विचारांची सत्ता स्थापन झाली आहे. कोरोना काळात विकास कामाना खिळ बसली होती. मात्र आता पुन्हा एकदा विकास कामांचा धडाका सुरु झाला आहे.

मसुचीवाडी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच राधिका पाटोळे यांनी अनेक कामाना गती द्यायला सुरवात केली आहे. त्यांना उप सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा प्रतिसाद चांगला लाभत आहे. गावातील पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे गाव अंतर्गत पाईपलाईन काम रखडले होते. त्याचे काम सुरु झाले आहे.

गावातील प्रत्येक गल्ली बोळात नविन पाईप लाईन टाकली जाणारा आहे. यामुळे भविष्यात २४ तास शुद्ध पाणी गावात मिळेल. त्याच बरोबर अंतर्गत रस्यांचे खडीकरण, मुरमीकरण यालाही गती मिळाली आहे. त्याचे ही काम सुरु आहे. गावचे लाईट बिल कोरोना आणि इतर बाबींच्यामुळे भरणे बाकी आहे तो प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल असे ग्रामपंचायत कडून सांगितले आहे.

Post a comment

0 Comments