Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

इंग्रजी माध्यमाच्या पाल्यांची फी पालकांनी भरावी : शिक्षणाधिकारी

सांगली: शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांना निवेदन देताना रावसाहेब पाटील, बाहुबली कबाडगे व अन्य. 

सांगली (प्रतिनिधी)
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार इंग्रजी माध्यमाच्या पाल्यांची फी पालकांनी हप्त्या हप्त्याने भरावी असे आवाहन शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी केले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाचे कोषाध्यक्ष श्री रावसाहेब पाटील यांनी दिली आहे.

रावसाहेब पाटील म्हणाले, शालेय फी संबंधित सध्या सुरु असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर शिक्षण अधिकारी श्री विष्णू कांबळे यांचे दालनात सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे पदाधिकारी व इंग्लिश मेडीयम स्कुल फोरमचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक झाली. यावेळी पालक शालेय फी भरत नसल्याचे पदाधिकाऱ्यांनी शिक्षण अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले.याबाबत शिक्षणाधिकारी यांनी पालकांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार हप्त्याने फी भरावी असे आवाहन केले.

तसेच कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये याची काळजी शिक्षणसंस्थांनी घ्यावी असे सांगितले. तसेच मागील २ वर्षातील आर. टी. इ कायद्यानुसार २५ % मोफत प्रवेशाचे शासनाकडून फी परतावा शिक्षणसंस्थांना प्राप्त झाला नाही, याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन शिक्षण अधिकारी यानी दिले. शाळाबाह्य , अनियमित , स्थलांतरित विध्यार्यांना शाळेच्या प्रवाहात सामील करण्यासाठी शोधमोहीम राबविण्याचे काम यापूर्वी कधीही इंग्रजी माध्यमाच्या शाळांना दिले नव्हते. परंतु यावर्षी कोरोनाच्या अडचणीमुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांनाही हे काम करण्याबाबत आदेश दिल्याचे सांगून त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळांना हि मोहीम प्रभावी पणे राबविण्याचे आवाहन केले. पुढील वर्षात अशी कामे लागणार नाहीत याची त्यांनी हमी दिली.

शिक्षणाधिकार्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी हे काम करण्याचे मान्य केले.इ. १० वी उत्तीर्ण विध्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखल संपूर्ण फी भरल्याशिवाय न देण्याच्या शिक्षण संस्थांच्या निर्णयास शिक्षणाधिकारी यांनी सहमती दर्शविली. अशा आशयाचा सूचनाफलक संस्थेने लावावेत असे निदर्शनास आणून दिले. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाचे कोषाध्यक्ष श्री रावसाहेब पाटील यांनी मा. शिक्षणाधिकार्यांचा सन्मान केला. इंग्लिश मेडीयम स्कुल फोरमचे अध्यक्ष बाहुबली कबाडगे यांनी निवेदन दिले. उपशिक्षणाधिकारी महेश धोतरे हेही याप्रसंगी उपस्थित होते.

या बैठकीत सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे कार्यवाह श्री, नितीन खाडिलकर , मुख्य प्रतोद श्री, विनोद पाटोळे , इंग्लिश मेडीयम स्कुल फोरमचे सेक्रेटरी कपिल राजपूत , शरद पाटील, नेहा फडके आदी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments