Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

आ. मानसिंगराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली वाडीवस्ती पर्यंत विकास कामे पोहचवू : विराज नाईक

पेठ : रस्ते कामाच्या शुभारंभ प्रसंगी युवा नेते विराज नाईक, युवा नेते अतुल पाटील, शरदकाका पाटील व अन्य.

पेठ (रियाज मुल्ला)
पेठसह वाड्यावस्त्यांची विकासकामे आ. मानसिंगराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण करू, असा विश्वास
विराज इंडस्ट्रीजचे संचालक युवा नेते विराज दादा नाईक यांनी व्यक्त केला. ते पेठ ता. वाळवा येथे आमदार मानसिंगराव नाईक यांचे माध्यमातून नायकल वस्तीला जोडणाऱ्या रस्ता कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.

यावेळी युवा नेते अतुल पाटील , उद्योजक शरदकाका पाटील, नामदेव कदम, संजय पाटील, शहाजी नायकल, अशोक पाटील, तुळशीदास पिसे, सुमित पाटील, विनोद गावडे, पतंग पाटील रंगराव केवळे, हर्षद पाटील, प्रकाश शेलार व नायकल वस्ती येथील ग्रामस्थ, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a comment

0 Comments