Daily Mahasatta

Daily Mahasatta

विट्यात सहाय्यक पोलीस निरीक्षकासह तिघेजण जाळ्यात; नगरसेवकाचा पोरगा बनला पंटर

विटा (प्रतिनिधी)
आत्महत्येस प्रवृत्त केल्याची गुन्ह्यातील संशयित आरोपीची पोलीस कोठडी न वाढवणे आणि गुन्हयाच तपास कामात मदत करणसाठी 1 लाखांची लाच स्वीकारताना विट्याचे सहाय्क पोलीस निरीक्षक प्रदिप पोपट झालटे, पोलीस कॉन्सटेबल विवेक यादव वय 28 वर्ष आणि विट्यातील विद्यमान नगरसेवकाचा मुलगा अकीब फिरोज तांबोळी व 23 वर्ष यांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. ही कारवाई विटा येथे शुक्रवारी सांकाळी करण्यात आली. 

याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार हे खाजगी ठिकाणी दिवानजी म्हणून काम करतात. तक्रारदार यांचे मालका विरूध्द विटा पोलीस ठोणे येथे आत्महत्येस प्रवृत्त केलेचा गुन्हा दाखल असून सदर गुन्हाचे कामी तक्रारदारार यांचे मालकांना अटक करण्यात आली होती. सदर गुन्ह्यात सहकार्य करणेसाठी व वाढ़ीव पोलीस कस्टडी न मागणेकरीता विटा पोलीस ठाणे येथील श्री. झालटे सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच श्री. यादव पोलीस कॉन्स्टेबल यांनी तक्रारदार यांचेकडे दीड लाख रूपये लाच मागितली असल्याची तक्रार लाचलुचपत विभागाली मिळाली होती.

ब्युरोचे कार्यप्रणाली प्रमाणे पडताळणी केली असता लोकसेवक श्री. झालटे सहाय्क पोलीस निरीक्षक तसेच लोकसेवक श्री. यादव पोलीस कॉन्स्टेबल यांनी तक्रारदार यांचेकडे दीड लाख रूपये लाच मागणी करून शुक्रवार 26 रोजी 1 लाख रूपये आणून देण्यास सांगितले होते. त्यानुसार विटा पोलिस ठाणे या ठिकाणी सापळा लावला असता झालटे आणि यादव यांनीनी तक्रारदार यांचेकडे दीड लाख रूपये लाचेची मागणी केली. तसेच कॉन्सटेबल विवेक यादव याच्या सांगणेवरून विट्यातील विद्यमान नगरसेवकाचा मुलगा अकीब फि’रोज तांबोळी याने तक्रारदार याचेकडून 1 लाख रूपये स्विकारले असताना त्यांना रंगेहात पकडणत आले आहे.
--------------------------

नगरसेवकाचा पोरगा 
बनला पोलीसांचा पंटर
खासगी सावकारी, मटका- जुगार अड्डे यासह हप्तेवसूलीमुळे विटा पोलीस ठाण्याची अब्रु चव्हाट्यावर टांगली आहे. ’याबरोबरच विटा नगरपरिषदेच विद्यमान नगरसेवकाचा मुलगाच पोलीसांचा पंटर बनून लाखो रूपांची वसूली करत असलचे उघडकीस आल्यामुळे पोलीसांसह राजकीय नेतेमंडळीच्या स्वच्छ चेहर्यावरील बुरखा फाटला असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.


Post a Comment

0 Comments