Daily Mahasatta

Daily Mahasatta

उमराणी सरपंच,उपसरपंचासह अधिकाऱ्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव

विधिमंडळात आ विक्रम सावंत यांची मागणी
जत, (सोमनिंग कोळी)
जत तालुक्यातील उमराणी येथील सरपंच,उपसरपंचासह तसेच पंचायत समीतीचे संबंधित अधिकारी यांनी शासकीय कामाचे उद्घाघाटन विद्यमान आमदारांना विश्वासात न घेता केल्या प्रकरणी त्यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव बुधवारी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडला.  यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती अशी , तालुक्यातील उमराणी येथील पशु वैद्यकीय दवाखाना श्रेणी एकचे उद्घाटन चार मार्च रोजी  जिल्ह्या परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्त कोरे, जि प  सदस्य मंगलताई नामद, माजी आमदार जगताप , सरपंच विजय नामद, उपसरपंच संजय शिंदे, अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला जतचे विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत यांना निमंत्रण देण्यात आले नाही. तसेच कार्यक्रम पत्रिकेवरही नाव छापण्यात आले नव्हते. आ.सावंत यांच्या स्वतःच्या मतदार संघातील एका गावात शासकीय कामाचे भूमिपूजन होत असताना त्यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आले. तसेच त्यांच्या पदाचा अवमान करण्यात आला होता. या कार्यक्रमास शासकीय यंत्रणेचा वापर करण्यात आला होता.

या प्रकरणी आ. सावंत यांनी बुधवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रस्ताव 273 अन्वये उमराणी सरपंच ,उपसरपंच व संबंधित दोषी अधिकारी यांच्या विरोधात हक्कभंगा चा प्रस्ताव मांडून तो विधानसभा अध्यक्षांनी स्वीकृत करावा अशी विनंती केली. दरम्यान आमदारांना डावलून ज्या संबंधित पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी कार्यक्रम घेतला, त्यांच्यावर कारवाई करण्याचे देखील मागणी त्यांनी केले आहे.
    
या संदर्भात जतचे गटविकास अधिकारी अरविंद धरंणगुतीकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले या कार्यक्रमा बदल मला काहीच माहिती नाही तसेच मी या कार्यक्रमास गेलो देखील नाही. तर पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे अभियंता शेख यांना विचारले असता ते म्हणाले जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.प्राजक्ता कोरे यांचा उमराणीस दौरा होता,  त्या दौऱ्यावेळी स्थानिक लोकांनी पशुवैद्यकीय दवाखान्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम घेतला त्यामुळे या कार्यक्रमास मी थांबलो असे स्पष्टीकरण शेख यांनी दिले.
------------------------
तो मजल मारणारा अधिकारी कोण?
आ.सावंत यांनी अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव मांडताना चांगलेच भडकले होते , शासकीय कामाचे उदघाटन करताना आमदारांना निमंत्रित करणे हा प्रोटोकॉल आहे. तसेच संबंधित ठेकेदार उपस्थित न्हवते, या कामाचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करावे, असा प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठवला आहे, तसेच  पंचायत समिती मधील एका अधिकाऱ्याची मजल फारच वाढली आहे, असे कृत्य जाणीवपूर्वक आणि हेतुपुरस्कत होत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले,  त्यामुळे जत प.स मधील तो मजल मारणारा अधिकारी कोण ? याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

Post a Comment

0 Comments