Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

मेणी जलसेतुला गळती, लाखो लिटर पाणी वाया

शेडगेवाडी : खूजगाव जवळील जलसेतुला गळती लागल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे.

शेडगेवाडी ( याकुब मुजावर)
शिराळा तालुक्याच्या पश्चीम विभागातील खुजगाव जवळील मेणी जलसेतुला गळती लागल्याने लाखो लीटर पाणी वापराविञना वाया जात असुन जलशेतुखालील जमीनीस धोका निर्माण झाल्याने शेतकर्‍यांतून संताप व्यक्त होत आहे. संबधित विभागाने याची गांभिर्याने दखल घेवुन मेणी जलशेतुची गळती काढावी, अशी मागणी जोर धरत आहे.

एकाबाजुला शिराळा तालुक्याचा उत्तरभाग पाण्यासाठी तहानलेला असतानाच  दुसर्‍याबाजुला शिराळा तालुक्यासाठी वरदायी ठरलेल्या खुजगाव जवळील मेणी जलसेतुचे जीर्ण झालेले जाॅईंट रबर पाण्याच्या प्रेशरने  तुटल्याने जलसेतुन दोन्ही बाजुने मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने लाखो लिटर पाणी  वाया जात आहे. संबधित विभागाने याची गांभिर्याने दखल घेवुन त्वरीत मेणी जलसेतुची गळती काढुन पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी मागणी होत आहे.


Post a comment

0 Comments