Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

विट्यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांची गाढवावरुन धिंड काढण्याचा प्रयत्न : महावितरण कार्यालयात खळबळ

विटा (प्रतिनिधी) : महावितरण विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मनमानी कारभाराला वैतागलेल्या विटेकर नागरिकांनी आज सोमवार ता. २२ रोजी कराड रस्त्यावरील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी वीज कनेक्शन तोडणार्या कर्मचाऱ्यांना गाढवावर बसविण्याचा प्रयत्न केल्यामुळे मोठी खळबळ उडाली.

विटा महावितरण विभागात गेल्या काही महिन्यांपासून मनमानी कारभार सुरु आहे. सामान्य नागरिकांची वीज कनेक्शन तोडली जात आहेत, मात्र मोठ्या थकबाकीदारांना जाणीवपूर्वक अभय दिले जात आहे. तोडलेली कनेक्शन जोडण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहे. त्यामुळे विटेकर नागरिकांत मोठा संताप होता. आज सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहीते, महाराष्ट्र राज्य औषध परिषदेचे अध्यक्ष विजय पाटील, माजी उपनगराध्यक्ष दहावीर शितोळे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून जाब  विचारण्यात आला.

यावेळी शंकर मोहिते यांनी महावितरणच्या अधिकार्यांना चांगलेच फैलावर घेतलं. वीज कनेक्शन तोडणार्या कर्मचार्यांना पुढे बोलवा आम्ही त्यांची गाढवावरुन धिंड काढणार आहे  असे सांगताच मोठी खळबळ उडाली. आपला कारभार लवकरच सुधारा अन्यथा आता अधिकार्यांचीच गाढवावरुन धिंड काढून तोंडाला डांबर फासू असा इशारा देण्यात आला. यावेळी केमिस्ट संघटनेचे नेते विजय पाटील यांनी देखील मेडिकल दुकानाचे वीज कनेक्शन तोडल्यास परिणामाना सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असा इशारा दिला .

Post a comment

5 Comments

 1. बिल भरायची लाज वाटते आणि चालले नेतेगिरी करायला

  ReplyDelete
 2. मदारचोद बिल भरा अगोदर माफी कशाची पाहिजे,,, वापर केला तर भरावाच लागेल न

  ReplyDelete
 3. लाईट सारखं काही स्वत काही नाही खाजगीकरण झाले तर लात मारून पैसे काढतील आणि पुढारीच काय चालणार नाही सरळ पोलिस आणुन वसुली करतील पुढारी फक्त मतांसाठी दंगल झाल्यावर कोणता पुढारी आला भावांनो हे फक्त मतदानासाठी नंतर कोणी विचारत नाही

  ReplyDelete
 4. निषेध महावितरण हि जनतेची कंपनी आहे आणि ती टिकवण जनतेची जबाबदारी आहे त्यामुळे वीज बिल भरले पाहिजे हे नक्की

  ReplyDelete
 5. This comment has been removed by the author.

  ReplyDelete