Daily Mahasatta

Daily Mahasatta

आटपाडीत दहापेक्षा अधिक घरफोड्या केलेला चोरटा अखेर जेरबंद

आटपाडी (प्रतिनिधी)
सोने चांदीचे चोरलेले दागिने विक्रीसाठी आटपाडी येथील बायपास रस्त्यावर आलेल्या एका १९ वर्षाच्या तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले आहे. देवगण ऊर्फ देव्या बापु पवार (रा. आटपाडी) असे त्याचे नाव असून पोलीसांनी त्याच्याकडून २ लाख ८९ हजार ६८० रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत.

आटपाडी शहरात एक इसम बायपास रोड वरील हॉटेल दुर्गाप्रसाद जवळ सोन्या चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. या बातमीप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक वेरे व पथकाने छापा मारून देवगण ऊर्फ देव्या बापु पवार रा. सरकारी दवाखान्या पाठीमागे आटपाडी यास सोन्या-चांदीचे दागिन्यासह ताब्यात घेतले.

याबाबत फिर्यादी बाबु हणमंत जाधव रा. राजेवाडी यांचे अदिती ज्वलर्स, दिघंचीचे सराफी दुकान, वसंत
विष्णु जाधव रा. आबानगर चौक आटपाडी यांचे राहते घराचे कुलूप तोडून चोरी, सौ मनिषा उत्तम सरगर रा. कोर्टाचे समोर आटपाडी मुळ रा. तळेवाडी यांचे राहते घरातील चोरी, सौ. अरूणा अनिल वेदपाठक रा. दिघंची यांचे बंद घरातील चोरी, श्री. भारत पांडुरंग ठेंगले रा. आटपाडी यांचे बंद घराचे चोरी, श्रीमती शोभा मल्लाप्पा राचगोंड रा. विद्यानगर आटपाडी यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले होते.

संशयित आरोपी देवगण पवार व त्याचे साथीदारांनी आटपाडी व दिघंची परिसरात बंद घरावरती
पाळत ठेवुन रात्रीच्या वेळी चोऱ्या केल्या आहेत. तसेच देवगण पवार व त्याचे ७ साथीदारांनी सोलापुर जिल्हयात माळशीरस पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १९ जानेवारी २०२१ रोजी रात्रौ १० वा चे सुमारास पिलीव घाटात एसटी बस लुटण्याचे उद्देशाने मोटरसायकल वरून येऊन दगडफेक करत बस लुटण्याचा प्रयत्न केला. यात तीन प्रवासी जखमी झाले होते. तसेच बसचे नुकसान केले आहे. यात देवगण पवार हा गुन्हा केले पासुन फरारी होता.

संशयित आरोपी देवगण पवार याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून सुमारे २ लाख ८९ हजार ६८० रूपयांचे सोने चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आटपाडी परिसरात दहा पेक्षा अधिक घरफोड्या करुन पोलीसांसमोर अवाहान उभा करणार्या अट्टल चोरट्याला अटक करण्यात पोलीसांना अखेर यश आले आहे. या आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.


Post a Comment

0 Comments