Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

कडेगाव तालुक्यातील वांगी आरोग्य केंद्र पाण्याच्या विळख्यात

वांगी : येथील उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेल्या आरोग्य केंद्राला ताकारी योजनेच्या पाण्याचा विळखा पडल्याने आरोग्य केंद्राची अशी दुरवस्था झाली आहे

कडेगाव, (सचिन मोहिते)
वांगी (ता. कडेगाव) येथील नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या आरोग्य केंद्राची इमारतीला ताकारी पाणी योजनेचा विळखा पडला आहे. परंतु उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेल्या या आरोग्य केंद्राकडे संबंधित अधिकारी व कर्मचारी वर्गाचे साफ दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

वांगी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झालेनंतर बांधकामासाठी जागेची चाचपणी केल्यानंतर वांगी ग्रामपचांयतीच्या गट नं ३२६४ मध्ये बांधकाम करण्याचे निश्चित झाले. त्यानंतर ग्रामपंचायतीने ती जागा जिल्हा परिषदेच्या नावे करून दिली. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आरोग्य केंद्र याच ठिकाणी होणार यात शंकाच नव्हती. परंतु काही कारणास्तव गावातील ठराविक जणांनी जागा अयोग्य असल्याचे सांगून बांधकाम बंद करण्यात आले होते.

या सर्व धडामोडीवर योग्य तोडगा काढण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत व संबंधित अधिकारी यांनी जागेची पहाणी केली होती. त्यानंतर ग्रामसभा घेऊन सर्वानुमते परवानगीने बांधकाम सुरू करण्यात आले. परंतु तत्काकालीन मुख्यमंत्री यांचेकडुन बांधकाम स्थगितीचे आदेश मिळाल्याने काम पुन्हा बंद करण्यात आले होते . परंतु सर्व घडामोडी थांबवून आरोग्य केंद्र बांधकाम सुरू करावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयात वांगी ग्रामपंचायतिने याचिका दाखल केली होती. त्याचा निकाल उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे, सौ. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने वांगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम गट नं ३२६४ मध्ये पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा परिषदेला दिले होते .

त्यानंतर इमारतीचे सर्व सोयीनियुक्त बांधकाम पूर्ण झाले आहे . परंतु सद्य स्थितिला आरोग्य केंद्राच्या संपूर्ण इमारतीच्या चौहो बाजूला ताकारी योजनेचे पाणी साचले आसुन त्या पाण्यामुळे झाडेझुडपे वाढत असुन घाणीचे साम्राज्य वाढु लागले आहे. त्यामुळे सदरची पाण्यात डौलाने उभा असलेली इमारत उदघाटन होण्या अगोदर तरी कोसळणार का ? अशी चर्चा ग्रामस्थांत होत आहे .

Post a Comment

0 Comments