Daily Mahasatta

Daily Mahasatta

इस्लामपूर क्रेडाईच्या अध्यक्षपदी गणेश पाटील, कार्यवाह पदी महेश माळी

इस्लामपूर( हैबत पाटील )
क्रेडाई इस्लामपूरच्या अध्यक्षपदी इंजि. गणेश पाटील तर कार्यवाहपदी इंजि. महेश माळी व खजिनदार पदी भाविक पटेल यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. क्रेडाई इस्लामपूरची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली.

प्रमोटर्स बिल्डर्स यांची देशस्तरीय संघटनेची सांगली व इस्लामपूर येथे जिल्हयात शाखा आहे. यशवंत गुणवंत यांनी संघटनेचे नफा तोटा पत्रक, ताळेबंद अहवाल, लेखापरीक्षण अहवाल सादर केला, तो सर्वानुमते मंजूर झाला. संघटनेचे माजी अध्यक्ष इंजि. अमोल पाटील, यशवंत गुणवंत यांनी पुढील द्विवार्षिक कार्यकारणी जाहीर केली. सर्व निवडी एकमताने झाल्या.

त्रिमूर्ती रियालीटीजचे इंजि. गणेश पाटील हे वाळवा तालुका इंजिनिअर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष आहेत. तसेच जायंटस ग्रुप ऑफ इस्लामपूरचे माजी अध्यक्ष होते. सध्या वाळवा बझारचे संचालक व योग विद्या धामचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. इंजि. गणेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे समाजातून व बिल्डर्स लॉबी कडून अभिनंदन होत आहे. ईशान्य बिल्डर्सचे इंजि. महेश माळी यांची कार्यवाह म्हणून नेमणुक झाली आहे. त्यांना सामाजिक कार्याचा अनुभव आहे. रूद्राक्ष बिल्डर्सचे भाविक पटेल यांची खजिनदार पदी निवड तर उपाध्यक्ष पदी उमेश रायगांधी यांची निवड झाली आहे .

पी आर ओ. म्हणून सिध्दनाथ डेव्हलपर्सचे प्रविण फल्ले यांची निवड झाली आहे. सहकार्यवाह म्हणून किरीट पटेल यांची निवड झाली आहे. सहखजिनदार म्हणून इंजि. दत्तात्रय माने यांची निवड झाली आहे. संचालक पदी इजि. अरविंद भालेकर, इंजि. सतिश पाटील (अण्णा), इंजि राजेंद्र माळी, इंजि. नागेश कुंभार, श्रीनिवासआठवले, इजि. अमोल यादव, इजि, विजय पाटील, श्री. नितीन फल्ले, इंजि. अभिषेक फारणे, इंजि. अमोल गुणवंत, महादेव भालेकर, इंजि. संजय दाभोळे यांच्या निवडी झाल्या आहेत.

Post a Comment

0 Comments