Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

औद्योगिक क्षेत्रातील पेट्रोलिंग वाढविणार : पोलीस अधीक्षक

कुपवाड : कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इंडिया अँड कॉमर्स च्या वतीने आयोजित केलेल्या उद्योजकांच्या बैठकीत बोलताना जिल्हा पोलिस प्रमुख दिक्षित गेडाम सोबत चेअरमन शिवाजीराव पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती मनिषा डुबुले आदी.

कुपवाड : (प्रमोद अथणिकर) : औद्योगिक क्षेत्रातील चोर्या तसेच गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा मार्फत पेट्रोंलिंग वाढवून गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याबरोबरच सी.सी.टी.व्ही. कॅमेर्यांच्या देखरेखेखाली औद्योगिक क्षेत्र आणण्यासाठी या पुढच्या काळात प्रयत्न केले जातील असे आश्वासन जिल्हा पोलीस प्रमुख दिक्षित गेडाम यांनी दिले.

कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अॅन्ड कॉमर्सच्या वतीने आयोजित केलेल्या उद्योजकांच्या बैठकीत श्री. दिक्षित गेडाम बोलत होते. याप्रसंगी कृष्णा व्हॅली चेंबरचे चेअरमन शिवाजीराव पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती मनिषा डुबुले, गृह पोलीस उपअधिक्षक किशोर काळे, मिरज उपविभागीय अधिकारी अशोक विरकर कुपवाड एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक निरज उबाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बैठकीत उद्योजकांनी औद्योगिक क्षेत्रातील पोलीस गस्त, सी.सी.टी.व्ही. कॅमेरे, सिक्युरिटी गार्ड आदी विषयांवर मुद्दे उपस्थित केले. यावर जिल्हा पोलीस प्रमुख दिक्षित गेडाम यांनी समर्पक उत्तरे दिली. त्याचबरोबर संबधित अधिकार्यांना सुचनाही केल्या. 

या बैठकीस कृष्णा व्हॅली चेंबरचे माजी चेअरमन सतिश मालू, सचिव गुंडु एंरडोले, संचालक रमेश आरवाडे, दिपक मर्दा, हरीभाऊ गुरव, बाळासाहेब पाटील, अरूण भगत, सांगली मिरज मॅन्युफॅक्चरींग असो. अध्यक्ष संजय अराणके, उद्योजक भरणीधरण पांडेयन, बन्सीलाल ओस्तवाल, श्रीनिवास राव आदी उपस्थित होते. 

Post a comment

0 Comments