Daily Mahasatta

Daily Mahasatta

डॉ. पतंगराव कदम यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रम रद्ध

कडेगाव ,( सचिन मोहिते )
कडेगाव - पलुस मतदार संघांचे आमदार व काँग्रेस पक्षातील जेष्ठ नेते म्हणून संपूर्ण महाराष्ट्र ज्यांना ओळखतो ते म्हणजे स्वर्गीय. आ. डॉ. पतंगराव कदमसाहेब यांची पुण्यतिथी निमित्त उद्या मंगळवार दिनांक ०९ मार्च २०२१ रोजी सोनहिरा साखर कारखाना कार्यस्थळावरील समाधी स्थळी विनम्र आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करणेत आलेला आहे.

परंतु यावर्षी कारोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता किर्तन तसेच इतर सर्व कार्यक्रम रद्ध करण्यात आले असल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे. समाधीस्थळी दर्शन व फुले अर्पण करण्याची व्यवस्था सकाळी ८.३० वाजलेपासुन करणेत आलेली आहे. त्यानिमित्त सर्व उपस्थितांना व्यवस्थापनाकडून आवाहन करणेत येते की, स्व . डॉ पतंगराव कदम यांचे समाधी परिसरात कोरोना प्रार्दुभाव होऊ नये म्हणुन शासनाने घालुन दिलेले नियम व अटीचे पालन करुनच समाधीचे दर्शन घ्यावे व समाधीस्थळी कसल्याही प्रकारची गर्दी करु नये, असे सांगण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments