Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

होंडाची गाडी घेताय, मग पट्टणशेट्टी होंडाची ही खास ऑफर जाणून घ्याच

पाचव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पट्टणशेट्टी होंडाच्या खास पाच ऑफर्स : ग्राहकांचा मोठा प्रतिसाद

सांगली (प्रतिनिधी)
सांगलीमध्ये पट्टणशेट्टी होंडा हे 4S शोरुम (सेल्स, सर्व्हिस, स्पेअरपार्ट व सेफ्टी ) बायपास माधवनगर रोड वरती असून सदरच्या शोरूमचा पाचवा वर्धापन दिन मोठय़ा उत्साहात व आनंदात साजरा झाला. पाच वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहक मेळावा सत्यनारायण महापूजा व रक्तदान शिबीर आयोजित केले होते.

वर्धापन दिनानिमित्त होंडाच्या प्रत्येक गाडीबरोबर एक ग्रॅम सोन्याचे नाणे मोफत देण्यात येणार आहे. सदरची ऑफर मर्यादित कालावधीसाठी ठेवण्यात आली आहे . पाचव्या वर्धापन दिनानिमित्त पाच भव्य व आकर्षक ऑफर्स ठेवण्यात आल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने कमीत कमी 6.99% व्याज दर, गाडीची त्वरित डिलिव्हरी, शंभर टक्के लोन, एक्स्चेंज बोनस रक्कम रुपये दोन हजार, इंजिनवर सहा वर्ष वॉरंटी , स्पॉट बुकिंगवर आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत.

पट्टणशेट्टी होंडा हे शोरुम अल्पावधीतच सांगली जिल्ह्यामध्ये लोकप्रिय झाले असून पाच वर्षांत चाळीस हजारांहून जास्त समाधानी ग्राहक मिळवले आहेत. पट्टणशेट्टी होंडाला भारतातील नंबर एक डीलर होण्याचा मान सांगलीकरांच्या मुळे मिळाला असून तमाम सांगलीकरांचे जाहीर आभार संचालकांनी व अधिकारी व कर्मचायांनी मानले आहेत.

वर्धापन दिनानिमित्त सर्व्हिस मध्येसुद्धा विविध ऑफर्स जाहीर केल्या असून त्यामध्ये फ्री चेकअप व पार्ट व मजुरीवर भव्य सवलत देण्यात आली आहे .गाडीच्या इंजिन ओव्हरऑल वर सुद्धा भव्य सवलत जाहीर केली आहे. पट्टणशेट्टी होंडामध्ये सर्व सेल्स व सर्व्हिस स्टाफ पूर्ण अनुभवसंपन्न असून ग्राहकांनी या विविध ऑफर्सचा परिपूर्णपणे लाभ घ्यावा असे आवाहन पट्टणशेट्टी होंडाच्या संचालकांनी केले आहे.

पाच वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त वर्धापनदिन केक कापून मोठय़ा आनंदात व उत्साहात साजरा करणेत आला. सदर प्रसंगी सांगली जिल्हा ऑटोमोबाइल असोसिएशनचे अध्यक्ष मा. दिपक पाटील, मा. श्रीकांत तारळेकर, मा. सुनील पाटील , मा. रवी आडके, मा. अमित मगदूम ,मा. श्रीरंग केळकर ,सौ नीताताई केळकर, मा. शशिकांत काळगी, कर सल्लागार महादेव पट्टणनशेट्टी, कॉन्ट्रॅक्टर सुहास पाटील, प्रा. सुनील आडमुठे, प्रा. जुबेर शेख , प्रा. मिलिंद बुटाले , प्रा. किशोर पांड्याजी प्रा. शिरीष फाकडे, डॉ मल्लनगौडा पाटील, रामगोंडा पाटील साहेब जत, शशिकांत होर्तीकर उमदी, परमेश्वर व्हनमराठे साहेब संख, आप्पा रिसवडे साहेब, सीए माळी साहेब, सर्व इन्शुरन्स प्रतिनिधी सर्व फायनान्सचे प्रतिनिधी, पटनशेट्टी होंडाचे सर्व सेल्स ,सर्व्हिस मधील अधिकारी व कर्मचारीवर्ग उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी अभिनंदन करून आनंद व्यक्त केला. पट्टणशेट्टी होंडा यापुढेही सर्व ग्राहकांना चांगल्यात चांगली व अति उत्तम सेवा देण्यास कटीबद्ध आहे असे मत संचालकांनी व्यक्त केले .

Post a comment

0 Comments