Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

वनसंपदा जोपासणे काळाची गरज आहे : डॉ. एच. एम. कदम

सांगली / प्रतिनिधी : सध्याच्या काळात अनेक मोठ-मोठी झाडे 'या' ना 'त्या' कारणाने नष्ट होत चालली आहेत. वाढत जाणाऱ्या सिमेंटच्या जंगलात नैसर्गिक जंगल हरवत चालल्याचे सर्रास दिसून येत आहे. त्यावर मात करण्यासाठी वनसंपदा लावून त्याचे जतन करणे आपल्याच हातात आहे. भविष्यात ती काळाची गरज असल्याचे प्रतिपादन भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ. एच. एम. कदम यांनी केले.

येथील भारती विद्यापीठ डेंटल कॉलेजमध्ये जागतिक वन दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. शहाजी देशमुख, डेंटलच्या प्राचार्या डॉ. विद्या दोडवाड प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पब्लिक हेल्थ डेन्टिस्ट्री या विभागांतर्गत करण्यात आले. ग्लोबल वार्मिंगमुळे पुढच्या पिढीचे भवितव्य अंध:कारमय आहे. त्यासाठी वनांचे रक्षण करा. पर्यावरणाचे संतूलन राखा असा संदेश डॉ. शहाजी देशमुख यांनी दिला.

कॉलेजच्या आवारात डॉ. कदम यांच्याहस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.  डेंटलमधील आंतरवासिता करणाऱ्या विद्यार्थ्यांनी  रांगोळी स्पर्धा भरवल्या होत्या. त्यातून 'झाडे लावा, झाडे जगवा' तसेच व्हर्टिकल फॉरेस्ट म्हणजे  जागेअभावी बिल्डिंगवर, इमारतीवर झाडे लावणे. असा संदेश विदयार्थ्यांनी रांगोळीच्या माध्यमातून दिला होता. विभागप्रमुख श्रीवर्धन कलघाटगी, डॉ. तनुश्री दळवी, डॉ. चेतन पाटील, सतीश भोळे यांच्यासह सर्व विभागप्रमुख, डॉक्टर, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.  सूत्रसंचालन कृष्णा हावळ तर आभार डॉ. तनुश्री दळवी यांनी मानले.

Post a comment

0 Comments