Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

नेर्लेत आ. मानसिंगराव नाईक यांच्याहस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ

इस्लामपूर (हैबत पाटील)
नेर्ले (ता. वाळवा) येथे आज आज ४३ लाख रुपयांच्या कामांचा शुभारंभ, तर २७ लाख रुपयांच्या कामांचे उदघाटन अशा एकूण ७० लाखांच्या विकास कामाचा आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते शुभारंभ व उदघाटन कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी आमदार नाईक व इतर मान्यवरांनी वरातीचा राऊंड रस्ता डांबरीकरण (२७ लाख), दत्तात्रय जांभळे घर ते ए. जी. पाटील घरापर्यंत व कर्मवीर डेअरी ते महाडीक कोपरा रास्ता डांबरीकरण व खारी विहीर चौक ते प्रा. आ. केंद्र कोपरा रस्ता डांबरीकरण करणे (एकत्रित १२ लाख), शा. द. रानखांबे ते गावडे घरापर्यंत आर.सी.सी. गटर व रस्ता काँक्रीटीकरण (४ लाख) या कामांचा शुभारंभ केला. तसेच प्रकाश मेटकरी हॉटेल ते गणेश मंदिर आर.सी.सी. गटर व सी. डी. वर्क (३ लाख), शामराव चव्हाण घर ते बाबर घराचा कोपरा आर.सी.सी. गटर व सी. डी. वर्क (२ लाख), मोहन हिंदुराव पाटील ते अरविंद रणखांबे रास्ता काँक्रीटीकरण (५ लाख), सर्जेराव पाटील घर ते चांदोली वसाहत येथे आर.सी.सी. गटर (३ लाख), ग्रामपंचायत इमारत चेनलिंक कंपाऊंड व स्वच्छतागृह बांधणे (४ लाख), समशनभूमीकडे जाणारा रस्ता काँक्रीटीकरण (५ लाख) या पूर्ण झालेल्या कामाचे उदघाटन झाले.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, जिल्हा परिषद सदस्य संगीताताई पाटील, सरपंच छायाताई रोकडे, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष संजय पाटील, माजी सरपंच संभाजी पाटील, अप्पासाहेब माने, उपसरपंच विश्वास पाटील, कृष्णा कारखाना संचालक दिलीप पाटील व सुभाष पाटील, ग्रामपंचायत सदस्य निवास माने, शोभाताई पाटील, सविता माने, शरावती पाटील, राजाराम माळी, हिरोजी पाटील, जालिंदर पाटील, मोहन पाटील, डी. आर. पाटील, जयसिंग पाटील, डी. एस. पाटील, विजय पाटील, दिनकर मोकाशी आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a comment

0 Comments