: सुमारे पंधरा ते सोळा लाखाचे नुकसान.
जत (सोमनिंग कोळी)-
जत तालुक्यातील भिवर्गी येथील शेतकरी काशिनाथ मल्लाप्पा सुतार यांची द्राक्ष काढण्यासाठी आलेली बाग वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे सुमारे पंधरा ते सोळा लाखाचे नुकसान झाले आहे.
शेतकरी काशिनाथ सुतार यांची जमीन भिवर्गी फाट्यापासून दोन किलोमीटर अंतरावर रस्त्यालगत जमीन आहे. तेथे पाच एकर थामसन द्राक्ष बाग केली होती. त्यापैकी तीन एकर द्राक्ष बाग वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाले. एकशे वीस दिवस पूर्ण झाल्याने द्राक्ष विकण्यात येणारे होते. बागेत सुमारे 55 टन द्राक्ष होती. बाजारभावाप्रमाणे जवळपास पंधरा ते सोळा लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते.
परंतु दुर्दैवाने अचानक वादळी वारा बागेत घुसल्याने मांडवाचे तार तुटून खांब कोसळले त्यात द्राक्ष बाग जमीनदोस्त झाले. द्राक्षासह झाडांचाही मोठे नुकसान झाले आहे. पोटच्या पोराप्रमाणे हातावर द्राक्ष बाग जगवली होती. डोळ्यासमोर द्राक्ष बाग कोसळल्याने काशिनाथ सुतार यांना मोठा धक्का बसला आहे.

0 Comments