Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

विरोधकांनी सत्तेच्या काळात काय दिवे लावले? : चेअरमन अतुलबाबा भोसले

पेठ : ता. वाळवा येथे माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय द. पाटील यांनी आयोजित केलेल्या बैठकी प्रसंगी बोलताना चेअरमन डाॅ. अतुल भोसले. 

पेठ (रियाज मुल्ला)
कृष्णा कारखान्याच्या सत्तेसाठी विरोधकांनी सत्तेच्या काळात काय दिवे लावले? असा खडा सवाल कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन अतुलबाबा भोसले यांनी व्यक्त केला. ते पेठ ता. वाळवा येथे माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय द. पाटील यांनी आयोजित केलेल्या बैठकी प्रसंगी बोलत होते.

यावेळी बोलताना डॉक्टर भोसले म्हणाले, कृष्णा बँक असो किंवा चॅरीटेबल ट्रस्ट असो, या माध्यमातून अनेक लोकांच्या अडचणी दूर करण्याचे काम केले आहे. शेतीसाठी कर्ज असो किंवा लोकांना रोजगार व वैद्यकीय सेवा असो कारखान्याच्या, बँकेच्या व ट्रस्ट च्या माध्यमातून भोसले कुटुंबाने नेहमीच तत्परतेने सेवा देण्याचे काम केलेआहे. कृष्णा कारखान्यांने गेल्या पाच वर्षात तीन हजार रुपयाहुन अधिक दर दिलेला आहे. या पाच वर्षात साखर उतारा सर्वाधिक राहिला आहे.

शेतकऱ्यांच्या बिलात कपात न करता कारखान्याचा विस्तार केला आहे. यामुळेच आजअखेर कृष्णा कारखाना 9000 मेट्रिक टनापर्यंत गाळप करतो आहे. भविष्यात 12000 मेट्रिक टन गाळप करण्याचे क्षमता करण्याचे नियोजन आहे. मागील संचालक मंडळाने कर्जाचा डोंगर उभा केला. त्यांच्या काळात वाहतुकीची थकबाकी कोट्यावधी रुपयांची होती. त्यांना केवळ सत्तेसाठी कारखान्याची निवडणूक लढवायची आहे अशा स्वार्थी विरोधकाना सभासदांनी थारा देऊ नये असे डाॅ. भोसले यांनी आवाहन केले.

कार्यक्रमाचे स्वागत जयंत ज. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव भांबुरे यांनी तर आभार सुनील तवटे यांनी मानले. याप्रसंगी कृष्णा कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन लिंबाजी पाटील, संचालक संजय पाटील, दिलीप पाटील, गिरीष पाटील, यशवंत कदम, हेमंत पाटील, शरद पाटील, नामदेव कदम, फिरोज ढगे, शिवाजी खापे, महेश माळी, पै. जयंत पाटील, धनपाल जाधव हंबीरराव पाटील, माणिक देशमाने, विजय रं. पाटील, अनिल पाटील, सयाजी पाटील, डॉ. मानसिंग पाटील, जे. पी. पाटील, राहुल र. पाटील, अभिजित पाटील, मोहन पाटील, एम. एस. पाटील, टी. एस. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a comment

0 Comments