Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट

 


: एकाच दिवशी 186 रूग्ण कोरोना बाधित

सांगली प्रतिनिधी : राज्यासह सांगली जिल्हयात देखील कोरोनाचा विस्फोट सुरूच असून आज शुक्रवार ता.19 रोजी एकाच दिवशी 186 कोरोना बाधित रूग्ण आढळल्यामुळे सांगली जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. आज सांगली महापालिका क्षेत्रात सर्वााधिक 59 रूग्ण आढळले आहेत.

सांगली जिल्हयात गेल्या आठ दिवसात कोरोनाच्या रूग्णात झपाट्याने वाढ होत आहे. आठ दहा दिवसापूर्वी तीस ते चाळीसच्या संख्येने आढळून येणारी रूग्ण संख्या अचानक वाढत जावून आज थेट 186 इतकी झाली. काल गुरूवारी 76 रूग्ण आढळले होते. आज मात्र अवघ्या एकाच दिवसाच्या अंतरात रूग्ण संख्या दुप्पटीपेक्षा अधिक वाढली आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

आज सांगली महापालिका क्षेत्रात सर्वाधिक 59 इतके कोरोनाबाधित रूग्ण आढळले तर खानापूर तालुक्यात सर्वात कमी 2 रूग्ण आढळून आले आहेत. सांगली जिल्हयात तालुकानिहाय आढळून आलेले रूग्ण पुढील प्रमाणे ः आटापाडी-16, जत-26, कडेगाव-10, कवठेमंहकाळ -17 , खानापूर-2, मिरज -22, पलूस-6, शिराळा-3, तासगाव-5, वाळवा-20 तसेच महापालिका क्षेत्रातील सांगली शहर -40 आणि मिरज 19 असे एकूण 186 कोरोना बाधित रूग्ण जिल्हयात आढळून आले आहेत.

आतापर्यंत सांगली जिल्ह्यात 49 हजार 417 कोरोना बाधित रूग्ण आढळून आले असून यापैकी 46 हजार 979 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1 हजार 7771 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments