Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

जयवंत पाटील यांची महाराष्ट्र बहुजन सेनेच्या मिरज तालुका अध्यक्षपदी निवड

कुपवाड (प्रतिनिधी) : कुपवाड येथे नुकत्याच पार पडलेल्या बहुजन सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जयवंत पाटील यांची महाराष्ट्र बहुजन सेनेच्या मिरज तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ही निवड राज्याचे सरचिटणीस दत्ताजी यादव यांच्याहस्ते नियुक्ती पत्र देवून करण्यात आली.

या कार्यक्रमावेळी महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष सुभाष तुपे, जिल्हाध्यक्ष शहाजी वायदंडे, पै. शिवाजी लोखंडे (उपाध्यक्ष) उपस्थित होते. प्रास्ताविक जोतीराम निकम यांनी केले. सुरूवातीला दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी नुतन तालुका अध्यक्ष जयवंत पाटील यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी जयवंत पाटील म्हणाले, संघटनेचे कार्य तळागाळात पोहचवून बहुसंख्य बहुजनांना एकत्रित करून विकास करणार असल्याची ग्वाही दिली.

यावेळी संजय माने, प्रकाश तुपे, सुनिता भोसले, जयश्री सुतार, छाया दाभोळे, कमल वाघ, रुक्मिणी कांबळे, कुसुम पाटील, लक्ष्मी माळी, रुक्मिणी टवळ, विजया भोसले, सुनिता पवार, अनुसया पावले, मिराबाई हाडोळे, निवृत्ती माळी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक जोतिराम निकम यांनी तर आभार आनंदा देसाई यांनी मानले.

अधिक वाचा:

विट्यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांची गाढवावरुन धिंड काढण्याचा प्रयत्न : महावितरण कार्यालयात खळबळ

...............................................................

महा ' वसुली' सरकार बरखास्त करा: माजी आमदार विलासराव जगताप

...............................................................

जत मध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट ; सुमारे सात लाखांचे नुकसान


Post a comment

0 Comments