Daily Mahasatta

Daily Mahasatta

पेठ गावात संजय गांधी योजना, श्रावण बाळ योजनेंतर्गत १५ लाभार्थ्यांना मंजूरी पत्र

पेठ (रियाज मुल्ला)
पेठ ता. वाळवा येथे संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ व वृध्दापकाळ योजने अंतर्गत एकुण 15 लाभार्थ्यांना पेन्शन मंजूरी पत्र वाटप करण्यात आली. संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

पेठ गावचे युवा नेते अतुल पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विजय द. पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री संदीप पाटील , पेठ ग्रामपंचायत सदस्य डॉ. सुभाष भांबुरे,राजाराम बापू सुतगिरणीचे संचालक ज्ञानेश्वर पेठकर ,वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चे सरचिटणीस भागवत पाटील, राष्ट्रवादी सोशल मीडिया तालुका प्रतिनिधी रविकिरण बेडके, पेठ राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटक हणमंत कदम,दारिद्रय निर्मूलन अभियान समितीचे प्रतिनिधी जालिंदर पाटील, तुळशीदास पिसे आदी मान्यवर उपस्थित होते.

कोरोनाचे सर्व नियम पाळत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे स्वागत कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संदीप पाटील यांनी केले . संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय बापूंनी मार्गदर्शन व मनोगत व्यक्त केले तर शेवटी आभार तुळशीदास पिसे यांनी मानले .

Post a Comment

0 Comments