Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

माडग्याळात घर फोडून ५ लाखांचा मुद्देमाल लंपास : एक संशयित ताब्यात

जत (सोमनिंग कोळी) : जत तालुक्यातील माडग्याळ येथील कापड दुकानदार शिवानंद सिद्रम कोरे यांचे राहते घर फोडून रोख रक्कम व सोने चांदिचे दागिने असा पाच लाख रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. आज शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. चोरट्यानी शेतातील बंद घराचे कुलुप तोडून कपाटात ठेवलेले दोन लाख रूपये रोख व चाळीस ग्रॅम सोने,व चांदी असे मिळुन पाच लाख रूपये मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. 

शिवानंद कोरे हे माडग्याळ अंकलगी रस्त्यावर कोरेवस्ती येथे राहण्यासाठी आहेत. माडग्याळ गावापासून पासुन 2 किमी अंतरावर त्यांचे घर आहे. शिवानंद सिद्राम कोरे यांच्या शेतातील बंद घराचे कुलुप चोरट्यानी तोडून घरातील कपाटामध्ये घराच्या बांधकामासाठी आणुन ठेवलेले दोन लाख रूपये व गावातील अंबाबाई मंदिराचे सोन्याची दागिने त्यांंच्याजवळ ठेवण्यासाठी दिलेले चाळीस ग्रँम सोने चोरट्यानी कपाट फोडुन मुद्देमाल लपांस केला आहे.

आज शुक्रवार माडग्याळ गावचा बाजार असल्याने घरातील सर्वजण बाजारात गेले होते. याचाच फायदा घेऊन चोरट्यानी डाव साधला आहे .दुपारी बाजार करून घरातील मंडळी शेताकडे गेले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती उमदी पोलिसाना देण्यात आली असुन उमदीचे सहायक पोलिस निरिक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून सांगलीवरून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

..............................

एक संशयित ताब्यात

दरम्यान एका व्यक्तीस संशयीत म्हणुन ताब्यात घेऊन पोलिस अधिक तपास करीत आहेत,. काल रात्री एक पानाडयाचा मुक्काम त्यांच्या घरी होता. तो सकाळी उठून गावी गेला होता. मात्र फोनवरून बोलताना गडबडल्याने संशयित म्हणून त्याला ताब्यात घेऊन त्याची पोलिस कसुन चौकशी करीत आहेत.

Post a comment

0 Comments