Daily Mahasatta

Daily Mahasatta

बोरगावच्या सावकर दादा काॅलनीमधील ड्रेनेजचा प्रश्न मार्गी

बोरगाव : सावकर दादा काॕलनीमध्ये ड्रेनेज कामाची सुरवात करताना जि. प. सदस्य मा. जितेंद्र पाटील व ग्रामस्थ

वाळवा (रहिम पठाण)
बोरगाव ता. वाळवा येथील सावकार दादा काॅलनी परीसरात नविन ड्रेनेज कामाची सुरवात जि. प. सदस्य मा. जितेंद्र पाटील (भाऊ) यांच्या उपस्थिती मध्ये करण्यात आली. यामुळे काॕलनीमधील सांडपाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.

सावकार दादा काॅलनी परीसरातील ड्रेनेजचा प्रश्न अनेक दिवसांपासून रखडला होता. या परिसरात ड्रेनेजची चांगली सुविधा निर्माण करुन सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकालात काढावा, अशी परिसरातील नागरिकांची मागणी होती. या मागणीची दखल घेऊन जि. प. सदस्य मा. जितेंद्र पाटील (भाऊ) यांच्या प्रयत्नातून ड्रेनेजचा प्रश्न मार्गी लागला आहे.

यावेळी सरपंच सौ. जयंती पाटील उप सरपंच शकील मुल्ला, संजय पाटील, दादा पाटील प्रमोद शिंदे, सचिन देसाई, आनंदराव पाटील, मानसिंग शिंदे, पी. एम. शिंदे, स्वाती पाटील ही प्रमुख मंडळी व काॕलनी मधील नागरीक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments