जत (सोमनिंग कोळी)
जत तालुक्यातील खैराव येथे गॅसचा स्फोट होवून दीपक बाळू ढगे यांचे पत्र्याचे घर जळून खाक झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली. या घटनेत ढगे यांचे संपूर्ण घर जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
यावेळी या घटनेची माहिती मिळताच तातडीने आमदार विक्रमसिंह सावंत पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब कोडग, खैरावचे सरपंच राजू घुटूकडे, कोडीबा घुटूकडे, भारत शिरसागर, जैनू मुलाणी, येळवीचे उपसरपंच सुनील अकंलगी,दीपक अकंलगी, प्रवीण तोडकर, आदीजन घटनास्थळी भेट देऊन ढगे कुटूंबियांना धीर देत, स्वखर्चातून जीवनोपयोगी वस्तू देण्यात आल्या.
शासनाच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी
सर्वोत्परी प्रयत्न करु अशी ग्वाही यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांना दिली.

0 Comments