Daily Mahasatta

Daily Mahasatta

राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या सांगली जिल्हा सचिव पदी तेजस सन्मुख

: पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते निवडीचे पत्र स्वीकारताना तेजस सन्मुख.

सांगली (प्रतिनिधी)
नाम. जयंतरावजी पाटील साहेबांचे कट्टर समर्थक व विद्यार्थी चळवळीतील अग्रभागी व्यक्तिमत्व असणारे बुधगावचे तेजस सन्मुख यांची राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस च्या जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली. राज्याचे जलसंपदामंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री नाम. जयंतरावजी पाटील साहेब यांच्या हस्ते त्यांना निवडपत्र प्रदान करण्यात आले.

पक्षाच्या अडचणीच्या काळात तेजस सन्मुख यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस मध्ये सक्रीय होत कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता विविध आंदोलनाच्या माध्यमातून पक्षाला सक्षम बनविण्याकरिता प्रयत्न केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. स्वतःच्या कर्तुत्वाने राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस च्या सांगली शहर जिल्हा च्या जिल्हा प्रवक्तेपदी वेगळा ठसा उमटवला. तसेच महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या विद्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देखील उत्तमपणे पार पाडली आहे. आता राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस च्या ग्रामीणच्या जिल्हा सचिव पदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे.

यावेळी विद्यार्थीचे महाराष्ट्र प्रभारी सनी मानकर, प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, उपाध्यक्ष सुहास कदम, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश पाटील, पदवीधर चे विशाल सुर्यवंशी यांच्यासह प्रदेश चे प्रतिनिधी व जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments