Daily Mahasatta

Daily Mahasatta

प्रतिक पाटील कोरोना पाॅझिटीव्ह, घरीच विलगिकरणात राहणार

इस्लामपूर ( सूर्यकांत शिंदे )
जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांचे चिरंजीव, सांगली जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष युवानेते प्रतीक पाटील यांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
सोशल मीडियावर त्यांनी स्वतः ही माहिती व्हायरल केली आहे.

प्रतिक पाटील यांचा सध्या संपूर्ण मतदार संघात मोठ्या प्रमाणात संपर्क आहे. मंत्री पाटील यांच्यासोबतही ते मतदार संघात सक्रिय असतात. काही दिवसांपूर्वीच मंत्री पाटील यांनीही आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी ट्विटरवरून व्हायरल केली होती. तेव्हापासून ते मुंबई येथे क्वारंटाईन आहेत. त्यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रतीक यांनी तात्काळ स्वतःला होम क्वारंटाईन करून घेतले होते. आता त्यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे की, 'माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझी तब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरी मी विलगिकरणात आहे. काळजी नसावी.

Post a Comment

0 Comments