Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

सांगली महापालिकेचे ७१० कोटींचे अंदाजपत्रक सादर

: अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ नाही
सांगली ( प्रतिनिधी)
सांगली महापालिका प्रशासनाच्यावतीने अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर करण्यात आले. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी हे 2020 : 21 चे सुधारित आणि 2021 : 22 चे मूळ अंदाजपत्रक सभापती पांडुरंग कोरे यांच्याकडे सादर केले. आयुक्तांनी सादर केलेले अंदाजपत्रक 710 कोटीचे आणि 43 लाख शिलकीचे असून या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही.

यावेळी उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, नगरसचिव चंद्रकांत आडके आदी उपस्थित होते. प्रशासनाच्या मुळ अंदाजपत्रकात रस्ते विकास, क्रीडांगण विकास, ड्रेनेज योजना, महापालिका शाळा विकास, पाणी पुरवठा तसेच जलनिस्सारण यासाठी तरतूद आहे. महिला बालकल्याणसाठी आहे तेवढीच तरतूद धरण्यात आली आहे. याचबरोबर आखर्चित निधी सुद्धा पुढील वर्षांमध्ये वर्ग करण्यात आला असून तोही वापरता येणार आहे. याचबरोबर शहराच्या प्रदूषणविषयक उपायांसाठी शासनाच्या सूचनेनुसार 25 कोटींचा निधी राखीव ठेवणेत आला आहे.

तसेच समाजकल्याणचा 5 टक्के निधीही पुढील वर्षात वर्ग करण्यात आला आहे. उपयोगकर्ता कर, मार्केट लायसेन्स दरात मागील वर्षी सुधारणा केल्यामुळे पुढील वर्षीच्या अंदाजपत्रकात कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही असे मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले.

Post a comment

0 Comments