: ३३ वार्षिक सभा संपन्न
सांगली (प्रतिनिधी)कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित. सांगली ची सन २०१९ - २०२० ची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पध्दतीने संपन्न झाली. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील होते.
कोरोनाच्या पाश्श्वभुमीवर लांबणीवर पडलेली वार्षिक सभा ऑनलाईन पध्दतीने संपन्न झाली. चेअरमन रावसाहेब पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी कोरोनाच्या बिकट परिस्थितीत देखील संस्थेने ठेवी, कर्जे, वसुली, भागभांडवल , नफा याचे उद्दीष्ट पुर्ण केले आहे. भविष्यात सभासदांना चांगली सेवा देण्यासाठी सर्व आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करेल. सन २०१९ - २०२० चा लाभांश सभासदांना देणारी ही सर्वात पहिली संस्था असल्याचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी सांगितले.
त्यांनी मागील तसेच विद्यमान सांपत्तिक स्थिती विषद केली. संस्थेच्या ठेवी ५३१ कोटी , कर्जे ३९८ कोटी भागभांडवल २१ कोटी ७५ लाख, खेळते भांडवल ६१० कोटी आहे. संस्था १००० कोटीच्या व्यवसायाकडे वाटचाल करीत असल्याची माहिती त्यांनी दिली. सभेची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील व स्व. डॉ. आप्पासाहेब चोपडे यांचे प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलनाने झाली. संचालक अॅड. एस. पी. मगदूम यांनी श्रध्दांजलीचा ठराव मांडला.
संस्था चांगले कामकाज करीत असल्यामुळे सभासद नंदकुमार साळुंखे यांनी संस्था व संचालकाच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. सीए. बी. डी. वांगीकर यांनी संस्था करीत असलेल्या सुधारणांची माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदूम यांनी केले. संस्था यावेळी व्हाईस चेअरमन श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे, संचालक डॉ. नरेंद्र आनंदा खाडे, डॉ. रमेश वसंतराव ढबू, श्री. लालासाहेब थोटे, श्री. ओे. के. चौगुले (नाना) श्री. आप्पासाहेब गवळी , तज्ञ संचालक डॉ. एस. बी पाटील, संचालिका सौ. ललिता अशोक सकळे इ. उपस्थित होते. आभार संचालक श्री. वसंतराव नवले यांनी मानले.
0 Comments