Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करत यात्रा भरवली, २० जणांवर गुन्हा

इस्लामपूर ( सूर्यकांत शिंदे )
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करत यात्रा भरविल्याप्रकरणी सुरुल ता. वाळवा येथील २० जणांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस शिपाई सूर्यकांत शिवाजी निकम यांनी याबाबतची फिर्याद इस्लामपूर पोलीस ठाण्यात दिली आहे.

सर्जेराव शंकर पाटील, महेश कैलास वायदंडे, निवृत्ती जगन्नाथ मदने, अशोक रंगराव पाटील, भगवान रघुनाथ पाटील, विक्रम सर्जेराव पाटील, दत्तात्रय मारुती पाटील, संग्राम विजय गायकवाड, माणिक परसु पाटील, शिवाजी परसू पाटील, पोपट रघुनाथ पाटील, शंकर कोळेकर, अभिजित सर्जेराव पाटील, महादेव तुकाराम बंडगर, किरण वसंत पाटील, संजय मारुती पाटील, नवनीत नानासो पाटील, जयवंत मारुती पाटील, सुशील माणिक पाटील, बरमा मामा बाळासो पाटील सर्वजण रा. सुरुल ता. वाळवा यांच्यासह अन्य अनोळखी ४० ते ५० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या धर्तीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात धार्मिक यात्रा/जत्रा/उरूस भरण्यास बंदीचे आदेश दिले होते. त्यानुसार सुरुल येथील यात्रा कमिटी व पदाधिकारी यांची बैठक घेऊन तशा यात्रा न भरविण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. यात्रा बंद करण्यासाठी आदेश देण्यात आले होते. त्या अनुषगाने सुरुल गावामध्ये पोलीस पथक बंदोबस्त करत होते. रात्री सव्वादहाच्या सुमारास अचानकपणे, ६०/७० लोक रथ ओढत आणताना दिसले. त्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी काहीही न ऐकता रथ मंदिरापर्यंत ओढत आणून लावला. या सर्व घटनेची इस्लामपूर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

Post a comment

1 Comments

  1. सभांना गर्दी चालते.....धार्मिक कार्यक्रमाचे काय?

    ReplyDelete