Daily Mahasatta

Daily Mahasatta

अवकाळी व अतिवृष्टीची नुकसान भरपाई तातडीने जमा करा : अशोकराव माने


कवठेमहांकाळ, (अभिषेक साळुंखे )
अवकाळी व अतिवृष्टीचे नुकसान भरपाई व पीकविमाचे पैसे व ठिंबक सारखी मिळणारी अनुदान तातडीने शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग करा व ऊस उत्पादकांचे ऊस बिले शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करून त्यांना थकबाकीदार होण्यापासून वाचवा. तसेच पंजाबराव देशमुख योजनेचा लाभ मिळवून द्यावा असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते अशोकराव माने यांनी संबंधित यंत्रणेकडे केली.

द्राक्ष, डाळिंब, ऊस व इतर बागायतदार शेतकर्‍यांना नियमित खातेदार होण्यासाठी शेतकर्‍यांना अर्थिक मदत मिळावी. कोरोना संसर्गाच्या टाळेबंदीमुळे बाजारबंदी सारख्या इतर संकटात शेतकरी सापडल्याने आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. गेल्यावर्षी अवकाळी अतिवृष्टीचे नुकसान भरपाईची रक्कम पीकविम्यांची रक्कम व ठिंबक व इतर अनुदानाची रक्कम व साखर कारखान्यांकडे गाळप झालेल्या ऊसाची बिले तातडीने शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग करणे गरजेचे आहे. त्यांना थकीत होण्यापासून वाचवण्यासाठी जिल्हा बँकेनेही सातबारा, स्वंयघोषणापत्र इतर बँकांच्या दाखल्याच्या लावलेल्या जाचक अटी रद्द करून पूर्वीप्रमाणे कर्जपुरवठा करावा.

राज्य आणि केंद्र सरकारच्या व्याजदरात मिळणाऱ्या पंजाबराव देशमुख योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी त्वरित शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे वर्ग करण्याची मागणी संबंधित यंत्रणेकडे केली असल्याचे व जिल्हा बँकेनेही नवीन कर्जपुरवठा करताना फिरवाफिरवी करताना सातबारा इतर बँकांच्या बाबतचे कर्जासंबधीचे पत्र स्वंय घोषणापत्र अश्या जाचक अटी रद्द कराव्यात अन्यथा संबधित बँक जबाबदार शासकीय यंत्रणा यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे माहिती शेतकरी संघटनेचे नेते अशोकराव माने यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
-----------------------------------

शेतकर्‍यांना नियमित खातेदार होण्यासाठी शासकीय अनुदान, अवकाळीची नुकसान भरपाई, पीक विम्याच्या रक्कमा व ऊसबिले तातडीने शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग करा.
अशोकराव माने
शेतकरी संघटनेचे नेते

Post a Comment

0 Comments