Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

सांगली जिल्हयात १० एप्रिल रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

 


सांगली (प्रतिनिधी) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांचे निर्देशानुसार शनिवार १० एप्रिल रोजी विजय व्यं. पाटील- अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सांगली यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालय सांगली व सांगली जिल्हयातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी, कौटुबिक वादासंबंधीची, कामगार वादाची, भू-संपादनाची, मोटार अपघात नुकसान भरपाईची, कौटुंबिक हिंसाचाराची, चलनक्षम दस्तऐवज कायदा कलम १३८ खालील प्रकरणे आणि वादपूर्व प्रकरणांत बँक, दूरसंचार, वीज, बिल, घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची प्रकरणे ठेवता येणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व वकील, पक्षकार, कर्मचारी यांनी योग्य ती काळजी घेवून उपस्थित पक्षकारांनी राष्ट्रीय लोकअदालतमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून प्रकरणे तडजोडीने मिटविणेबाबतचा लाभ घ्यावा असे आवाहन मा श्री. विश्वास शि. माने -सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली यांनी केलेले आहे.

* अधिक वाचा *

Post a Comment

0 Comments