Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

संख मध्यम प्रकल्पातून कॅनालला पाणी सोडा, अन्यथा आंदोलन : सोमनिंग बोरामणी

जत (सोमनिंग कोळी)
जत तालुक्यातील संख तलावातून कॅनॉल व बोर नदीला पाणी सोडावे या मागणीचे निवेदन बेळोडगी सोसायटीचे चेअरमन सोमनिंग बोरामणी यांनी प्राताधिकारी प्रशांत आवटे व पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांना दिले आहे. निवेदनात म्हंटले आहे की तलाव हा पूर्णपणे भरलेला असून गेल्या दहा वर्षात एकदा सुद्धा कॅनालला पाणी सोडले नाही.

संख मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्याकरिता कोट्यावधीची रुपये खर्च करून शासनाने संख ते उमदी पर्यत कॅनॉल केले आहेत.1998 साली एकदाच पाणी सोडले होते. शासनाने शेतकऱ्यांना पाण्याचा उपयोग व्हावा म्हणुन कोट्यावधी रुपये खर्च करून कॅनॉल तयार केलेले आहेत. शेतकऱ्यांना शेत जमीनी अधिग्रह संपादन करून पैसे दिलेले आहेत. बोर नदीवर असलेले चेक डॅम बांधुन करजगी, बोगी, बालगांव, सुसलाद येथील शेतकऱ्यांना सुध्दा उपयोग झालेला नाही. सदर कॅनाल असुन त्याचा उपयोग न करण्यास हे शाखाधिकारी पाटबंधारे शाखा संखा हे एकमेव कार्यालय जबाबदार आहे.

तरी सदर संख तलावातुन करजगी, बेळोंडगी, हळ्ळी, उमदी पर्यंत कनॉलद्वारे करजगी बोगी, बालगांव, वेळांडगी, सुसलाद, हळी हे बोअर नदीने पाणी सोडल्यास ह्या भागातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. सदर तलावातुन पाणी सोडण्याकरीता आपले कार्यालयामार्फत संवधीतांना योग्य आदेश होणेस विनंती आहे. सदरचे पाणी कॉनॉलला व बोर नदीला न सोडल्यास आम्ही या गावातील शेतकऱ्यांसह अप्पर तहसिल कार्यालयासमोर तीव्र आंदोलन अथवा उपोषण करावे लागेल असा इशारा बोरामणी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Post a comment

0 Comments