Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

येळदरी येथील जळीतग्रस्त कुटुंबियाना योगेश बामणे यांच्याकडून मदत

 जत (सोमनिंग कोळी )
तालुक्यातील येळदरी येथील जळीतग्रस्त सिद्राय माने कुटुंबियाना एनएसयुआय चे जत तालुका अध्यक्ष योगेश बामणे यांच्याकडून संसार उपयोगी साहित्याची मदत करण्यात आली. येळदरी मानेवस्ती येथे शुक्रवारी दुपारी झोपडीवजा कुडाचे घरास आग लागून झालेल्या नुकसानीत माने कुटुंबाचा संसार उघड्यावर पडला होता.

या आगीत संसारपयोगी साहित्य रोख रक्कम तीन तोळे सोने, शेळी दोन कोकरू, एक दुचाकी जळून खाक झाले होते. यामध्ये 10 लाख नुकसान झाल्याने माने कुटुंब उघड्यावर पडले होते. यामुळे त्यांना आर्थिक सहाय्य व धीर देण्याच्या हेतूने एनएसयुआयचे जत तालुका अध्यक्ष योगेश बामणे यांनी संसार उपयोगी साहित्याची मदत देवून माने कुटुंबियास धीर दिला.

यावेळी यावेळी पृथ्वीराज कृषी सेवा केंद्र चे मालक बंडू भोसले, देवनाळ ग्रामपंचायतीचे सदस्य सुनिल चव्हाण व अजय शिंदे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a comment

0 Comments