Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

ट्रक चालकास लुटणार्या कुपवाडातील दोघांना अटक

कुपवाड (प्रमोद अथणिकर)
कुपवाड परिसरातील सावळी येथे आर टी ओ ऑफिस नजीक ट्रक ड्रायव्हर आणि क्लिनर या दोघांची लुटमार करणार्या आरोपीचा शोध लावण्यात पोलीसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सलमान नौशाद शेख वय. २३ वर्षे रा कापसे प्लॉट, जुना बुधगाव रोड, कुपवाड व आशिष शहाजी काटे वय- ३० वर्षे रा. कापसे प्लॉट कुपवाड यांना अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, कुपवाड येथे ट्रक
ड्राइव्हर व क्लिनर दोघे जेवण करून रिक्षा क्र एम १० के ३२७४ मधून बसून आर टी ओ सावली ऑफिस जवळ उतरले असता रिक्षा चालक व अनोळखी दोन इसमाने त्यांना बेदम मारहाणं करून त्यांच्याकडील सुमारे २८ हजार पाचशे रुपयांचे दोन मोबाईल व रोख रक्कम लुबाडण्याचा प्रकार घडला होता.

त्यानंतर निरज उबाळे सहायक पोलीस निरीक्षक एमआयडीसी कृपयाड पोलीस ठाणे यांनी पोलीस उपनिरीक्षक आर. एस. अन्नछत्रे यांचे नियंत्रणा खाली सदरचा गुन्हा उघडकीस करणेसाठी खास पथक तयार करण्यात आले होते या पथकांनी सीसीटीव्ही फुटेज व त्या परिसरातील नागरिकाच्या कडुन माहिती प्राप्त करुन त्या आधारे गुन्हाचा छडा लावून दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांचेकडील रिक्षा ,दोन मोबाईल फोन व रोख रक्कम १५०० असा एकूण ८० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .
या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अन्नछत्रे हे करीत आहेत

Post a comment

0 Comments