Daily Mahasatta

Daily Mahasatta

आदर्शच्या विद्यार्थिनींची नामांकित टी सी एस कंपनीत निवड

विटा ( प्रतिनिधी ) : आदर्श अभियांत्रिकी महाविद्यालय व रिसर्च सेंटर, विटा येथील कु. प्रतिक नामदेव पाटील व कु. दिपाली विलास पवार या संगणक शास्त्र अभियांत्रिकी विभाग शाखेतील विद्यार्थिनीची आय टी क्षेत्रातील टाॅप एम एन सी कंपनी टी सी एस मध्ये फेब्रुवारी २०२१ च्या आॅनलाईन प्लेसमेंट ड्राईव्ह मधून निवड झाली आहे.

आदर्श ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशन्स संस्थापक अॅड सदाशिवराव(भाऊ) पाटील व चेअरमन अॅड वैभवदादा पाटील यांनी ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी- विद्यार्थीनी यांना असामान्य यशाच्या उंचीवर घेऊन जाण्याचे स्वप्न पाहिले होते. ते आज सत्यात उतरताना दिसत आहे, असे मत संचालिका मा पुजा पाटील मॅडम यांनी व्यक्त केले. या दोन्ही विद्यार्थिनीेच्या उल्लेखणीय कामगिरीबद्दल महाविद्यालयाच्या संचालिका मा पुजा पाटील यांनी अभिनंदन केले

यावेळी प्राचार्य डी. के. महाडिक, सेंट्रल टी पी ओ प्रा. नारायण खरजे, विभागप्रमुख प्रा. गणेश वेदपाठक व प्रा. डी. के. जाधव, विद्यार्थी समन्वयक रविराज सुर्यवंशी हे उपस्थित होते.Post a Comment

0 Comments