Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

जत मध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट ; सुमारे सात लाखांचे नुकसान

जत (सोमनिंग कोळी)
जत तालूक्यातील तिकोंडी येथे घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन काशीबाई बसप्पा चौधरी यांचे छप्पर वजा पत्र्याचे घर जळून खाक झाले. ही घटना रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. या मध्ये सुमारे सात लाखांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अधिक माहिती अशी की, तिकोंडी गावापासून एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या चौधरी वस्ती येथे काशीबाई चौधरी यांचे कुटुंब राहते. रात्री अचानक काशीबाई यांच्या आईला लकवा मारल्याने सकाळी कराड या ठिकाणी उपचारासाठी नेण्यासाठी तिकोंडी गावात आले होते. परत जाऊन पाहिले असता  गॅसचा स्फोट होऊन छप्पर वजा पत्र्याचे घर जळून खाक झाले होते. ही घटना रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान घडली. स्फोट इतका भयानक होता की, दोन किमी परिसरात त्याचा आवाज घुमत होता. स्फोटाचा आवाज ऐकून आग विजवण्यासाठी गावातील लोकांनी धाव घेऊन आग विजवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना अपयश आले.

शुक्रवारी माडग्याळ जनावर बाजारात शेळी विकून आलेले २५ हजार रोख रक्कम, संसार उपयोगी साहित्य,२५ हजर रुपये किमतीची बागेची औषधें, २ तोळे सोने,२ तोळे चांदी व ५ पोती ज्वारी व कडधान्ये जळून अंदाजे पाच ते सात लाखापर्यत नूकसान झाले. वेळीच सावध झाल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. चौधरी कुटुंबाकडे स्वतःचे कपडे सोडून त्यांच्याकडे काहीच शिल्लक उरले नाही. हे कुटुंब पूर्णपणे उघड्यावर पडले आहे. ह्या घटनेने परिसरातील लोक हळहळ व्यक्त करत आहेत. पीडित कुटुंबाला जास्तीत जास्त मदत प्रशासन व इतर माध्यमातून मदत करावी अशी मागणी चौधरी कुटुंबातून होत आहे. घटनास्थळी उशीरा पर्यत पंचनामासाठी महसूल विभागाचे अधिकारी कोणीच फिरकले नाही.

Post a comment

0 Comments