Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

कोरोना लसीकरणासाठी सर्वांनी पुढे यावे : आमदार गाडगीळ

सांगली (प्रतिनिधी)
कोरोना लस पूर्णपणे सुरक्षित असून याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. त्यामुळे कोरोना योद्धा पत्रकारांसह समाजातील सर्व घटकांनी कोरोना लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन आमदार सुधीर गाडगीळ यांनी केले आहे.

सांगली विधानसभा मतदार संघाचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी सांगलीच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात जाऊन कोरोना प्रतिबंधक लस घेतली. तसेच डॉ. नंदकिशोर गायकवाड यांच्याकडून लस घेतल्या नंतर प्रमाणपत्र ही देण्यात आले.

यावेळी आमदार गाडगीळ यांनी कोरोनाशी दोन हात करण्यासाठी पात्र नागरिकांनी लस घ्यावी आणि स्वतःला सुरक्षित ठेवावे,. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. नागरिकांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही. तसेच समाजाचे विविध प्रश्न मांडण्यासाठी समाजात अधिक प्रमाणात वावरत असणाऱ्या कोरोना योद्धा पत्रकारांनी सर्वप्रथम लस टोचून घ्यावी आणि स्वतःला सुरक्षित ठेवावे असे आवाहन केले.

यावेळी सांगली सिव्हिल हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ नंदकुमार गायकवाड, डॉ रविकांत राठोड डॉ. प्रफुल्ल हुलके, अंजली वेदपाठक नर्सिंग स्टाफ आदी उपस्थित होते..

Post a comment

0 Comments