Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

साटपेवाडीत शाॅर्टसर्कीट मुळे आग, घरातील साहित्य जळून खाक


वाळवा (रहिम पठाण) : साटपेवाडी ता. वाळवा येथे शाॅर्टसर्कीटमुळे श्री. विजय सोपान पाटील यांचे राहत्या घराला आज आग लागली आगीमध्ये घरातील संपूर्ण साहीत्य जळून खाक झाले आहे.

आज सायंकाळच्या सुमारास अचानक घरामध्ये आग लागल्याचे त्यांच्या घरातील लोकांच्या लक्षात आले. विजय पाटील यांच्या घराचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे ते बाजूलाच शेडवजा घरामध्ये राहत होते. घराच्या बांधकामामुळे सर्वच संसार उपयोगी साहीत्य एकत्रीत होते. याच मुळे संपूर्ण साहीत्य आगीमध्ये जळून खाक झाले आहे. आगीमध्ये कपडे, धान्य, फर्निचर हे पूर्ण खराब झाले आहे. या घटनेमध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. सगळे साहीत्य एकत्रित असल्यामुळे आग आटोक्यात आणण्यात अडथळा येत होता.

घटना घडल्यानंतर त्वरीत महावितरणाचे कर्मचारी याना कळवले गेले ते ही वेळेत पोहचले. त्यामुळे घरातील मिटर पासून आग लाईट पोलच्या बाजूने जात होती. ती थांबवता आली त्यामुळे पुढचा अनर्थ टाळता आला.प्रशासनाचे लोक घटनास्थळी पोहचले व त्यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. परंतु आयुष्यभराचा संसार असा डोळ्यासमोर खाक होताना पाहताना घरची माऊली धायमोकलुण रडत होती.

Post a comment

0 Comments