Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी सांगलीत भाजपची जोरदार निदर्शने


महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले असल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. 

सांगली (प्रतिनिधी)  : गृहमंत्री  अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी सांगलीत शहर भाजपा तर्फे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालय समोर महाविकास आघाडी सरकारच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देत निदर्शने करण्यात आली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाजे यांना महिन्याला 100 कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता.  त्यांच्या या आरोपानंतर सर्वत्र राज्यात खळबळ उडाली होती. गृहमंत्र्यांच्या विरोधात सर्वत्र तीव्र निदर्शने करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सांगली शहर भाजपा तर्फे सांगलीत निदर्शने करण्यात आली.

यावेळी बोलताना शहर जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना बोलावून महिन्याला शंभर कोटी रुपये वसूल झाले पाहिजेत असे आदेश दिले होते. ही गोष्ट महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत लाज वाटणारी आहे. इतक्या वर्षात अशा प्रकारचा आरोप कोणत्याही गृहमंत्र्यावर कधीच झालेला नव्हता असा आरोप होऊनही गृहमंत्री राजीनामा देत नाहीत. वास्तविक त्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे. त्यांनी दिलेल्या वसुलीचा आरोपाचे तातडीने व सखोल चौकशी करून गृहमंत्र्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. शासनाला या प्रश्नाचे उत्तर समाजाला द्यावेच लागेल असे सांगितले.

भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा स्वाती शिंदे म्हणाल्या , महाराष्ट्राच्या लौकिकाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. हे महाविकास आघाडी सरकार नसून महा वसुली आघाडी सरकार आहे पोलिस खात्याचा वापर खंडणी वसुली साठी करण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलिसांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न झाला आहे. एखादा पोलीस आयुक्त असे आरोप करतो म्हणजे म्हणजे ती निश्चितच गंभीर घटना आहे. त्यामुळे गृहमंत्री यांच्या वर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली.

याप्रसंगी संघटन चिटणीस दीपक माने, युवा मोर्चा अध्यक्ष धीरज सूर्यवंशी, मोहन व्हणखंडे, गटनेते विनायक सिंहासने, नगरसेवक, संजय कुलकर्णी, युवराज बावडेकर, संदीप आवटी, सुबराव मद्रासी, अल्पसंख्याक चिटणीस अश्रफ वांकर, ओबीसी मोर्चा अमर पडळकर, नगरसेविका गीतांजली ढोपे पाटील, सोनाली सगरे, अप्सरा वायदंडे, कल्पना कोळेकर, उर्मिला बेलवळकर, दरीबा बंडगर, धनेश कातगडे, अतुल माने, श्रीकांत वाघमोडे, केदार खाडिलकर, गौस पठाण अक्षय पाटील, अक्षय पाटील, स्मिता भाटकर, स्मिता पवार, गंगा तिडके, ज्योती कांबळे, माधुरी वसगडेकर, प्रिती काळे, शैलजा पंडित, वैशाली पाटील, सुनिता इनामदार, अविनाश मोहिते, शहाजी भोसले, बाळासाहेब पाटील, अमित भोसले, राहुल माने, प्रियानंद कांबळे, उमेश हारगे, राजू जाधव, तसेच सर्व मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments